SEBI holds Adani Wilmar IPO due to investigation against Adani Enterprises big blow to him
Gautam Adani यांना मोठा झटका, SEBI कडून Adani Wilmart च्या आयपीओला स्थगिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 2:50 PM1 / 12Adani Wilmar IPO: उद्योगपती गौतम अदानी यांना बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मोठा झटका लागला आहे. सेबीनं अदानी विल्मर (Adani Wilmar) च्या आयपीओवर बंदी घातली आहे.2 / 12Adani Wilmar ही कंपनी ४५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार होती. परंतु अदानी एन्टरप्राईजेसच्या (Adani Enterprises) विरोधात सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर सेबीनं यावर स्थगिती आणली आहे.3 / 12अदानी विल्मरचे एडिबल ऑईलमध्ये अनेक प्रोडक्ट्स आहे. Fortune Oil हा त्यातील सर्वात परिचयाचा प्रोडक्ट आहे. याशिवाय कंपनी तांदूळ, सोयाबिन, बेसन, डाळ, साबण, साखर आणि पीठ यासारख्या अनेक प्रोडक्ट्सचं उत्पादन करते. कंपनीचे अनेक प्रोडक्ट Fortune या प्रोडक्टखाली येतात. 4 / 12या प्रकरणाशी निगजीत एका व्यक्तीनं नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं की सेबनं अदानी एन्टरप्रायजेसच्या विरोधात सुरू असलेल्या तपासामुळे अदानी विल्मरच्या आयपीओवर स्थगिती आणली आहे. 5 / 12सेबीच्या धोरणांनुसार आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या कंपनीचा कोणत्याही विभागाद्वारे तपास सुरू असेल तर त्यांच्या आय़पीओला ९० दिवसांसाठी मंजुरी देता येत नाही. ९० दिवसांनंतरही पुढील ४५ दिवसांसाठी आयपीओ स्थगित केला जाऊ शकतो. 6 / 12Adani Wilmar या कंपनीमध्ये Adani Enterprises चा ५० टक्के हिस्सा आहे. त्या हिशोबानं अदानी विल्मरमध्ये अदानी एन्टरप्राईजेसच्या हिस्स्याचं मूल्यांकन १८,७५० ते २२,५०० कोटी रूपये असू शकतं. अदानी विल्मरचा आयपीओ एक फ्रेश इश्यू असेल.7 / 12जेपी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्योरिटीजना बँकर्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अदानी विल्मर अदानी एन्टरप्राईजेस आणि विल्मर इंटरनॅशनलचं एक जॉईंट व्हेन्चर आहे. यामध्ये दोन्ही समुहांची ५०-५० टक्के भागीदारी आहे.8 / 12फूड कंपनीबाबत Adani Wilmar ची मोठी योजना आहे. या योजनेनुसार Adani Wilmar २०१७ पर्यंत भारतातील सर्वात मोठी फूड कंपनी बनेल. Adani Wilmar द्वारे गौतम अदानी हे बाबा रामदेव यांच्या Ruchi Soya या कंपनीला टक्कर देतील.9 / 12Adani Wilmar चा Fortune हा सर्वात लोकप्रिय प्रोडक्ट आहे. या कंपनीची स्थापना अदानी समूह आणि सिंगापूरमधील Wilmar कंपनीसोबत जॉईंट व्हेन्चरमध्ये १९९९ मध्ये झाली होती. अॅग्री बिझनेस हा त्यांना मुख्य व्यवसाय आहे.10 / 12Adani Wilmar नं आपल्या बेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एडिबल ऑईल मार्केटमध्ये आपल्या देशातील सर्वात मोठं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. संपूर्ण देशात त्यांचे ८५ स्टॉक पॉईंट आणि ५०० डिस्ट्रीब्यूटर्स आहेत.11 / 12रिटेल मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा जवळपास १० टक्के आहे. संपूर्ण देशात जवळपास १५ लाख रिटेल आऊटलेटवर त्यांचे प्रोडक्ट उपलब्ध असतात.12 / 12आरोग्याकड़े लक्ष देत कंपनीनं स्पेशल ऑईल Rice Bran and Vivo लाँच केलं आहे. तर कंपनीचं अन्य एक एडिबल ऑईल ब्रांड Rupchanda बांगलादेशमध्ये मार्केट लीडर आहे. तर याव्यतिरिक्त कंपनीच्या दोन मोठ्या रिफायनरीदेखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications