Second Tranche Of Gold Bonds Scheme Opens On May 24 Check Issue Price modi government rbi
सरकार देणार स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; पाहा काय आहे स्कीम By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 12:45 PM1 / 15केंद्र सरकारनं सोवरेन गोल्ड बॉन्डच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४,८४२ रूपये प्रति ग्रॅम हे मूल्य निश्चित केलं आहे. नागरिकांना यामध्ये २४ ते २८ मेदरम्यान गुंतवणूकीची संधी देण्यात आली आहे.2 / 15पहिल्या टप्प्यासाठी सरकारनं सबस्क्रिप्शनसाठी ४,७७७ रूपयं प्रति ग्रॅम इतकं मूल्य निश्चित करण्यात आलं होतं. गोल्ड बॉन्ड ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति ग्रॅम ५० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. 3 / 15केंद्र सरकार मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बाँड्स जारी करणार आहे. 4 / 15यामध्ये पहिल्या टप्प्यातील गुंतवणूकीसाठी १७ मे ते २१ मेदरम्यान संधी देण्यात आली होती. आता सरकारनं दुसऱ्या टप्प्यासाठीही किंमत निश्चित केली आहे. 5 / 15गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे. भारतात गुंतवणूकीसाठी सोवरेन गोल्ड बॉन्ड चांगला पर्याय मानला जातो. हे केंद्र सरकारच्यावतीनं रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येतात.6 / 15सोवरेन गोल्ड बॉन्डच्या अर्जासह गुंतवणूकदाराकडे पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. सोवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूकदारांना ऑनलाइनदेखील खरेदी करता येणार आहे. 7 / 15याशिवाय गुंतवणूकदारांना बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काही पोस्ट ऑफिसेस यातून सोवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतात.8 / 15याशिवाय गुंतवणूकदारांना एनएसई, मुंबई शेअर बाजारातूनही सोवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतील. 9 / 15सोवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये गुंतवणूकदारांना एका आर्थिक वर्षात कमाल ४ किलोग्राम सोन्याच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करता येते. तर कमाल गुंतवणूक एक ग्राम सोन्याची असते. 10 / 15HUFs एका आर्थिक वर्षात ४ किलोग्रामपर्यंत सोन्यात गुंतवणूक करू शकणार आहेतच. तर ट्रस्टना २० किलोग्राम पर्यंत गुंतवणूक करू शकतात. 11 / 15सोवरेन गोल्ड बॉन्ड मॅच्युरिटीवर टॅक्स फ्री असतं. यामध्ये एक्सपेन्स रेशो काहीही नाही. भारत सरकारद्वारे हे देण्यात येत असल्यानं यात डिफॉल्टचा धोका नसतो. 12 / 15हा HNIs साठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये मॅच्युरिटीपर्यंत होल्ड केल्यानं कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागत नाही. 13 / 15इक्विटीवर १० टक्के कॅपिटल गेन टॅक्स लागतो. अशा परिस्थितीत दीर्घ काळाच्या गुंतवणूकीसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 14 / 15फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बॉन्ड मॅनेज करणं सोपं आणि सुरक्षित असतं. यामध्ये प्लोरिटी तपासण्यासारख्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. तसंच किंमत सर्वात शुद्ध सोन्याच्या आधारावर निश्चित केली जाते. 15 / 15यामध्ये बाहेर पडण्याचे पर्यायही सोपे असतात. गोल्ड बॉन्डवर कर्ज घेण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications