शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock Loss : आधी एका वर्षांत १ लाखांचे केले ९२ लाख, आता ६ महिन्यांत शेअरनं गुंतवणूकदारांची उडवली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 10:02 AM

1 / 5
SEL Manufacturing Company: पेनी स्टॉक्स कधी लखपतीवरून कोट्यधीश बनवतील आणि कधी झोप उडवतील हे सांगणं कठीण आहे. असाच एक शेअर आहे ज्यानं एकाच वर्षाच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना एका मोठ्या उंचीवर पोहोचवलं आणि आता आपटवलंही. आम्ही SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या (SEL Manufacturing Company) शेअर्सबद्दल बोलत आहोत.
2 / 5
वर्षभरापूर्वी SEL च्या शेअरची किंमत 6.45 रुपये होती आणि बरोबर एक वर्षानंतर, 8 नोव्हेंबर 2022 रोजी, म्हणजेच आज ती 9192 टक्क्यांनी वाढून 599.35 रुपयांवर आहे. वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणाऱ्यांच्या या रकमेचे मूल्य आज सुमारे 92 लाख रुपये झाले असते. परंतु, ज्यांनी 6 महिन्यांपूर्वी SEL मध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांची या स्टॉकने झोपच उडवली आहे. सततच्या घसरणीनंतर याचं ट्रेडिंग थांबवण्यात आले होते.
3 / 5
टेक्सटाईल्स क्षेत्रातील कंपनी SEL मॅन्युफॅक्चरिंगचा शेअर 6 महिन्यांत 60 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. जर एखाद्या व्यक्तीने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 6 महिन्यांसाठी गुंतवले असते, तर आज ती रक्कम 39 हजार रुपयांवर आली असती.
4 / 5
6 महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 मे 2022 रोजी तो कंपनीचा शेअर 1535.30 रुपयांवर व्यापार करत होता. आता त्याची किंमत 599.35 रुपयांपर्यंत खाली आली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक सुमारे 61 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या घसरणीनंतरही वर्षाच्या सुरुवातीपासून 1250 टक्के परतावा दिला आहे. घसरण सुरू होण्यापूर्वी, SEL च्या शेअर्समध्ये बऱ्याच काळासाठी अपर सर्किट लागले होते.
5 / 5
9 मे पर्यंत या स्टॉकच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. 9 मे रोजी हा शेअर 1235 रुपयांवर होता आणि 13 जूनपर्यंत तो 906 रुपयांपर्यंत खाली आला. 12 ऑगस्टपर्यंत हा शेअर 648.50 रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आणि त्याच महिन्याच्या 23 तारखेपर्यंत हा शेअर 868 रुपयांवर गेला. त्यानंतर पुन्हा या शेअरमध्ये चढ उतार दिसून आला. (टीप - या ठिकाणी केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक