शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेल्फ मेड उद्योजकांच्या यादीत 'डी-मार्ट'चे राधाकिशन दमानी ठरले 'टॉपर', कसं उभं केलं साम्राज्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 8:58 AM

1 / 10
Hurun list of 200 Self-made Entrepreneurs : डी-मार्टचं (Dmart) कामकाज चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (Avenue Supermarts) संस्थापक आणि शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांना ओळखीची गरज नाही. दमानी हे मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत आघाडीवर आहेत. सर्वात श्रीमंत सेल्फ मेड उद्योजक म्हणून त्यांचं मार्केट कॅप २.३८ लाख कोटी रुपये आहे.
2 / 10
३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट हुरुन इंडियाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय त्यांच्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल आहेत, ज्यांची इक्विटी व्हॅल्यू १.१९ लाख कोटी रुपये आहे.
3 / 10
या यादीत झोमॅटोचे दीपिंदर गोयल आणि ड्रीम ११ चे प्रमोटर भावित शेठ आणि हरीश जैन यांचाही समावेश आहे, ज्यांचं मार्केट कॅप ८६,८३५ कोटी रुपये आणि इक्विटी व्हॅल्यू ६६,४५२ कोटी रुपये आहे. या यादीतील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये ८ स्टार्टअप आहेत. या यादीतील ५६ टक्क्यांहून अधिक संस्थापकांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय, तर १० चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ७ डॉक्टर आहेत.
4 / 10
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या राधाकिशन दमानी यांचे वडील शेअर मार्केटमध्ये काम करायचे. सुरुवातीला त्यांचे कुटुंब मुंबईत एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. दमानी यांनी कॉमर्स शाखेत शिकण्यासाठी मुंबई विद्यापीठात (Mumbai University) प्रवेश घेतला, मात्र एका वर्षानंतर त्यांनी शिक्षण सोडलं.
5 / 10
यानंतर त्यांनी बॉल बेअरिंगचं काम सुरू केलं. वडिलांच्या निधनानंतर, दमानी यांनी बॉल बेअरिंगचा व्यवसाय सोडला आणि ते शेअर बाजारातील ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले. १९९२ पासून त्यांच्या या कामाला गती मिळाली.
6 / 10
बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना राधाकिशन दमानी आपले गुरू मानत. आपण त्यांच्याकडून शेअर बाजाराच्या प्रत्येक गोष्टी शिकल्याचं दमानी म्हणाले.
7 / 10
राधाकिशन दमानी त्यांच्या ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स या गुंतवणूक फर्मद्वारे त्यांचा पोर्टफोलिओ देखील मॅनेज करतात. राधाकिशन दमानी यांनी करिअरच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई केली. ८० आणि ९० च्या दशकात त्यांचं नाव गुंतवणूकदार म्हणून चर्चेत आलं.
8 / 10
सुमारे २१ वर्षांपूर्वी, म्हणजे २००२ मध्ये, राधाकिशन दमानी यांनी १ बीएचके फ्लॅटमधून रिटेल चेन डीमार्टची सुरुवात केली. अवघ्या वीस वर्षांत ही कंपनी कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे.
9 / 10
राधाकिशन दमानी यांनी DMart च्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १४९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या नफ्याचा दैनंदिन हिशोब केला, तर ही रक्कम दररोज चार कोटी रुपये येते. गेल्या आर्थिक वर्षात DMart ची विक्री ३०,९७६ हजार कोटी रुपये होती.
10 / 10
सन २०२१ मध्ये राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या भावासोबत दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समधील नारायण दाभोलकर मार्गावर असलेला ‘मधुकुंज’ नावाचा बंगला १००१ कोटी रुपयांना विकत घेतला. हा बंगला १.५ एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेला आहे आणि त्याचे एकूण बांधलेले क्षेत्र सुमारे ६१,९१६ चौरस फूट आहे. हे मुंबईतील सर्वात महागडं घर मानलं जातं.
टॅग्स :businessव्यवसाय