शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोन्याचे दागिने विकताय? अडचण काय आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 2:58 PM

1 / 9
एतद्देशियांना सोन्याचा भारी सोस. त्यातही महिलांचे प्रमाण अधिक. सोन्याचा संग्रह करुन ते अडीअडचणीला मोडता येते. ही त्यामागची धारणा. त्यामुळे सोन्याचा भाव जरा वाढले की अनेकांचा कल आपल्याकडे सोने विकण्याकडे असतो. अर्थात हेतू निव्वळ नफा कमावण्याचा. परंतु अनेकदा असे होते की सोन्याची खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांत जुने सोने विकायला गेल्यास त्याचे रोख पैसे मिळतीलच असे नाही. असे का? जाणून घेऊयात...
2 / 9
भारतातील अनेक ज्वेलर्स हे सोन्याचे किरकोळ विक्रेते आहेत. ही सर्वात महत्त्वाची बाब. दररोज विकली जाणारी वस्तू किरकोळ विक्रेते परत खरेदी करत नाहीत तसेच ज्वेलर्सही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करु शकत नाहीत.
3 / 9
काही ठरावीक ज्वेलर्सकडेच सोन्याचे दागिने वा वस्तू विकून त्या बदल्यात रोख रक्कम घेता येण्याची सुविधा उपलब्ध असते.
4 / 9
जुने सोने विकायचेच असेल तर इनव्हाइस असणे महत्त्वाचे आहे. सोने कधी विकत घेतले. त्यावेळची किंमत किती, घडणावळ किती, त्या वेळचा सोन्याचा भाव किती इत्यादी. तपशील इन्व्हॉइसवर नोंदवलेला असतो.
5 / 9
त्यामुळे इनव्हॉइस असेल तर ज्वेलर्स जुने सोने खरेदी करण्याची तयारी दर्शवितात. हॉलमार्क नसलेले जागिने न घेण्याकडेच अनेकांचा कल असतो.
6 / 9
सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला की दागिने विकण्याकडे कल असतो. परंतु सोन्याचे दर संवेदनशील असतात. सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणि तेलाचे वाढते दर यामुळे सोने महागले आहे.
7 / 9
अशा स्थितीत घरातील सोने विकायला काढले तरी त्याच्या बदल्यात उच्चांकी भाव मिळेलच असे नाही. आज सोन्याचा भाव उच्चांक आहे. उद्या तो घसरुन मूळ पदावर आल्यास ज्वेलर्सना तोटा होतो. म्हणून ते असा व्यवहार करण्यास धजावत नाहीत.
8 / 9
सोन्याचे दरहिंदोळे सुरूच असल्याने दागिन्यांची योग्य रक्कम मिळेलच असं नाही. तेव्हा सोन्याचा त्या दिवसाचा खरेदी-विक्री दर नेमका किती याची तंतोतंत माहिती हवी असल्यास इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध असते. त्यानुसारच व्यवहार ठरतो.
9 / 9
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स, गोल्ड सेव्हिंग्ज फंड्स व सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स यांत गुंतवणूक करता येऊ शकते. असा सल्ला तज्ज्ञ देतात.
टॅग्स :Goldसोनं