शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रतन टाटा यांनी झिरोमधून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही वाजतोय डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 5:32 PM

1 / 8
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही रतन टाटा यांची चर्चा थांबायला तयार नाही. रतन टाटा यांच्या सेवाभावी आणि साध्या जीवनाबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र, व्यावसायिक जीवनातही टाटा खूप यशस्वी राहिले. रतन टाटा यांनी टाटा समूहाला अशा उंचीवर नेऊन ठेवलंय. जिथे पोहचणं म्हणजे खायचं काम नाही. रतन टाटा यांनी अनेक कंपन्यांना झिरोपासून हिरो केलं आहे. अशाच काही कंपन्यांची माहिती आपण घेऊयात.
2 / 8
टाटा समूहाने (Tata Group) २०२१ मध्ये बिग बास्केट खरेदी केली. नंतर ही देशातील सर्वात मोठी किराणा कंपनी बनली आहे. टाटा ग्रुपच्या अंतर्गत टाटा डिजिटलने हा करार २ बिलियन डॉलरला केला होता. बिग बास्केटचे काम चांगले होते. मात्र, प्रगती होत नव्हती. टाटा समूहाने ताब्यात घेतल्यानंतर कंपनीला सुगीचे दिवस सुरू झाले.
3 / 8
१९९९ सालची गोष्ट. टाटा मोटर्सची पहिली कार टाटा इंडिका बाजारात काही विशेष करत नव्हती, परदेशी कंपन्यांचा दबदबा वाढत होता. अशा परिस्थितीत रतन टाटा यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला. बिल फोर्ड यांची भेट घेतली. त्यावेळी फोर्डकडे जग्वार आणि लँड रोव्हरसारखे लक्झरी सेगमेंट होते. बिल फोर्ड यांनी अहंकाराने रतन टाटा यांचा प्रस्ताव नाकारला. पुढे २००८ मध्ये जेव्हा अमेरिकेतील मंदीच्या काळात फोर्डची अवस्थाही बिकट झाली. तेव्हा रतन टाटा यांनी लँड रोव्हर आणि जग्वार सेगमेंट २.३ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. आज तो एक लक्झरी ब्रँड बनला आहे.
4 / 8
रतन टाटा यांनी देवू कमर्शियल व्हेइकल्स ही कोरियन कंपनी विकत घेतली होती. ही कंपनी व्यावसायिक वाहने तयार करत असे. या करारानंतरच टाटा मोटर्सची कोरियातील पोहोच वाढली. २००४ मध्ये, टाटा मोटर्सने १०२ दशलक्ष डॉलर्सचा भारतातील सर्वात मोठा करार केला होता. त्यावेळी ही कंपनी तोट्यात चालली होती. मात्र, रतन टाटांच्या खरेदीनंतर ही कंपनी फायदेशीर ठरली आणि आज तिचे मोठे नाव आहे.
5 / 8
कोरस ग्रुप ही युरोपमधील दुसरी सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी होती आणि जगातील आठवी मोठी कंपनी होती. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीच्या स्टील सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी होत नव्हती. दरम्यान, रतन टाटा यांनी या समूहाची कोरस स्टील कंपनी विकत घेण्यासाठी ११.३ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, त्यानंतर कंपनीने सहमती दर्शवली आणि त्यानंतर २०१२ मध्ये टाटा समूहाची कंपनी बनली. आज ही कंपनी युरोपात तसेच जगभरात पोलाद पुरवठ्यासाठी मोठी उत्पादक कंपनी आहे.
6 / 8
रतन टाटा यांनी २००० मध्ये ४३१.३ दशलक्ष डॉलर्सला टेटली चहा विकत घेतला आणि चहाच्या व्यवसायात त्यांचा दर्जा वाढवला. आता हा चहा टाटा चहाचा लक्झरी ब्रँड बनला आहे.
7 / 8
२०२१ मध्ये, टाटा सन्सने देशातील प्रमुख एअरलाइन एअर इंडियावर नियंत्रण मिळवले. एअर इंडियाची सुरुवात रतन टाटा यांचे काका जेआरडी टाटा यांनी केली असली तरी काही वर्षांनी ती सरकारी कंपनी बनली होती.
8 / 8
रतन टाटा यांच्या कंपनीने आरोग्य क्षेत्रात काम करणारी 1MG कंपनी खरेदी केली आहे. पूर्वी ही कंपनी फक्त ऑनलाइन औषधे पुरवत असे, मात्र आता या कंपनीने डॉक्टरांचा सल्ला, औषधे आणि इतर सुविधाही देण्यास सुरुवात केली आहे. ही कंपनी झपाट्याने ऑनलाइन बाजारपेठ काबीज करत आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाbusinessव्यवसाय