शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SGB Scheme: फायदाच फायदा! 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक; दर 6 महिन्याला मिळेल गॅरंटेड रिटर्न्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 5:30 PM

1 / 6
Sovereign Gold Bond Scheme: केंद्र सरकार पुन्हा एका स्वस्त सोनं खरेदीची संधी देत ​​आहे. 2022-23 साठी गोल्ड बाँडची दुसरी सीरिज 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या योजनेत तुम्ही 26 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करू शकता. ग्राहक हे गोल्ड बाँड 5,197 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने खरेदी करू शकतात.
2 / 6
तुम्ही ऑनलाईन बाँड खरेदी केले तर तुम्हाला 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देखील मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या सीरिजमध्ये तुम्ही 5,197 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोने खरेदी करू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या क्लोजिंग प्राइसच्या अॅव्हरेज व्हॅल्यूवर ही किंमत ठरवण्यात आली आहे.
3 / 6
म्हणजेच 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीतील सोन्याच्या किमतीची सरासरी घेऊन किंमत निश्चित करण्यात आली आहे. 20 आणि 21 ऑगस्टला बाजार बंद होता. गेल्या वेळी गोल्ड बाँडची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. यावेळी बॉण्ड्स 5,197 रुपये प्रति ग्रॅम दराने खरेदी करता येतील. म्हणजेच या वेळी रोख्यांची किंमत पूर्वीपेक्षा 106 रुपये अधिक आहे.
4 / 6
या योजनेनुसार, तुम्ही ऑनलाइन सोन्याची खरेदी केली, तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजेच, तुम्ही फक्त 5,147 रुपये प्रति ग्रॅम दराने सोनं खरेदी करू शकता. या बाँडची मुदत 8 वर्षे आहे, पण तुमची इच्छा असल्यास तुम्ही 5 वर्षांनंतर कधीही या योजनेतून बाहेर पडू शकता.
5 / 6
या सॉवरेन गोल्ड बाँडचे वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक दराने 2.50 टक्केव्याज यावर मिळते. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाते. या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागतो. सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सोनं चोरीला जाण्याची चिंता नाही. याशिवाय चलनवाढ आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्यात गुंतवणूक ही चांगली संधी असू शकते.
6 / 6
या गोल्ड बाँड योजनेत तुम्ही एक ग्रॅम सोनंदेखील खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकता. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी करता येतं. अविभक्त हिंदू कुटुंबे आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ते बँक किंवा शेअर मार्केटमधून खरेदी करू शकता.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूक