SGB Vs Digital Gold Sovereign Gold Bond or Digital Gold Which is Better See difference more profit
SGB Vs Digital Gold: सॉवरेन गोल्ड बॉन्ड की डिजिटल गोल्ड, कुठे जास्त फायदा? पाहा काय आहे यात फरक By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:36 AM1 / 8SGB Vs Digital Gold: जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही एसजीबी म्हणजेच सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) किंवा डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करू शकता. दोन्हीमध्ये गुंतवणुकीचे फायदे आहेत. या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही. तसंच दीर्घकाळात सोन्याच्या किमतीनुसार परतावाही मिळणार आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड किंवा डिजिटल गोल्डमध्ये काय फरक आहे आणि त्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल आज जाणून घेऊ.2 / 8डिजिटल गोल्ड - डिजिटल सोनं आपल्याकडे फिजिकली नाही तर आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलं जातं. काळाच्या ओघात त्याची किंमतही वाढत जाते. गरज भासल्यास तुम्ही हे सोनं ऑनलाइन ही विकू शकता. यात केवळ १ रुपयात गुंतवणूक करता येते. 3 / 8भारतात एमएमटीसी-पीएएमपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MMTC-PAMP India Pvt. Ltd), ऑगमॉन्ट गोल्ड लिमिटेड (Augmont Gold Ltd) सारख्या कंपन्या डिजिटल सोनं ऑफर करतात. याशिवाय गुगल पे आणि फोनपे सारख्या लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातूनही तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता.4 / 8सॉवरेन गोल्ड बॉन्ड - सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे सरकारी बॉन्ड आहेत. ते आरबीआयकडून जारी करण्यात येतात. त्यात गुंतवणुकीतून जोखीम फार कमी आहे. हे बॉन्ड १ ग्रॅम सोन्याचे असतात, म्हणजेच १ ग्रॅम सोन्याची किंमत बॉन्डच्या किंमतीइतकीच असेल. सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही २४ कॅरेटच्या ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. यात तुम्हाला दुप्पट नफा मिळतो. 5 / 8एक तर मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला बाजारभावानुसार पैसे मिळतात आणि दुसरं म्हणजे ग्राहकांना २.५ टक्के वार्षिक व्याजही दिलं जातं. आरबीआय आर्थिक वर्षापासून वेगवेगळ्या टप्प्यात बॉन्ड्स जारी करते. दरम्यान, तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूक करू शकता.6 / 8सॉवरेन गोल्ड बॉन्डचा लॉक-इन पीरियड ५ वर्षांचा असतो. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला प्री-मॅच्युअर रिडेम्प्शन करता येतं. तसं तर हे गोल्ड बॉण्ड ८ वर्षात मॅच्युअर होतात. डिजिटल गोल्डमध्ये लॉक-इन पीरियड नाही. डिजिटल सोनं २४/७ ऑनलाइन खरेदी/विक्री करता येते. डिजिटल गोल्डला फिजिकल गोल्डमध्ये रुपांतरित करण्याचाही पर्याय आहे. पण सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये हा पर्याय मिळत नाही.7 / 8गोल्ड बॉन्डमध्ये तुम्हाला आरबीआयची गॅरंटी मिळते, तर डिजिटल गोल्डवर कोणत्याही रेग्युलेटरचे लक्ष नसतं. तथापि, डिजिटल सोनं विक्रेत्याद्वारे इन्श्योर्ड आणि सिक्युअर्ड वॉल्ट्समध्ये साठवलं जातं. यासाठी ग्राहकाला कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर कमीत कमी १ ग्रॅम सोनं खरेदी करावं लागेल. तर डिजिटल सोनं केवळ १ रुपयात खरेदी करता करता येतं. म्हणजे गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते.8 / 8डिजिटल गोल्ड आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड या दोन्ही बॉन्डवर तुम्ही लोन घेऊ शकता. सॉवरेन सोन्याची किंमतही २४ कॅरेट सोन्याइतकीच आहे. त्याचबरोबर यावर वार्षिक २.५ टक्के व्याज दिल्यास तुमचा नफा वाढतो. डिजीटल गोल्डमध्ये असा कोणताही अतिरिक्त व्याज मिळत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications