Share marcket stock market rekha jhunjhunwala earn rs 105 crore in just 10 minute with only 2 shares
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 8:17 PM1 / 9खरे तर, शेअर बाजार म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे कुणी जबरदस्त पासा कमावते आणि हिरो बनते, तर कुणी पैसे गमावून झिरो बनते. मात्र, थोडा अभ्यास करून आणि काहीशा समजदारीने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास, चांगला परतावा मिळू शकतो.2 / 9शेअर बाजारातील बिग बुल म्हणवल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी याच बाजारातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. आता त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला देखील त्यांच्याच मार्गाने जात आहेत.3 / 910 मिनिटांत कमावले ₹105 कोटी - शेअर बाजारात बऱ्याच दिवसांनंतर काही प्रमाणात चांगली स्थिती दिसत आहे. याचा रेखा झुनझुनवाला यांना मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजारातील काही प्रमुख गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या रेखा झुनझुनवाला यांनी मंगळवारी बाजाराच्या सुरुवातीच्या तेजीतच मोठा नफा कमावला आहे. त्यांनी केवळ दोन शेअर्सच्या बळावरच पहिल्या 10 मिनिटांत 105 कोटी रुपये कमावले आहेत. 4 / 9या दोन शेअर्सनं केली कमाल - रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील टायटन ( Titan) आणि मेट्रो ब्रँड्सच्या ( Metro Brands) शेअर्सनी कमाल केली आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात टायटनचा शेअर 20.90 रुपयांपर्यंत वधारला. तर मेट्रो ब्रँड्सचा शेअर 3.90 रुपयांच्या वधारला. 5 / 9टायटनचा शेअर 3310 रुपयांवरून वधारून 3340 रुपयांवर पोहोचला. तर मेट्रो ब्रँड्सचा शेअर ओपनिंग बेलसह 1177 रुपयांवरून वधारून 1180.95 रुपयांवर पोहोचला.6 / 9रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,57,13,470 शेअर आहेत. टायटनच्या शेअरमध्ये प्रति शेअर 20.90 रुपयांची तेजी आली. यामुळे रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती 95.54 कोटींनी वाढली. 7 / 9तसेच, त्यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे 2,61,02,394 एवढे शेअर आहेत. या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे त्यांची संपत्ती 10.18 कोटी रुपयांनी वधारली. 8 / 9अर्थात या दोन शेअर्सच्या बळावर त्यांनी केवळ 10 मिनिटांत 105.72 कोटी रुपये कमावले. रेखा झुनझुनवाला या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 72,814 कोटी रुपये एवढी आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे काही आलीशान घरांसह, लक्झरी कार आणि प्रॉपर्टी देखील आहे.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications