Share marcket This is called Dhamaka The ireda stock went from rs 32 to rs 200 in just 47 days
याला म्हणतात धमाका! हा सरकारी शेअर 47 दिवसांत ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, करतोय मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 3:58 PM1 / 8शेअर बाजारात इरेडाच्या शेअरमध्ये सध्या जबरदस्त तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर सोमवारी 5 पर्सेंटच्या तेजीसह 204.80 रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (IREDA) शेअर केवळ 47 दिवसांतच 32 रुपयांवरून थेट 200 रुपयांवर पोहोचला आहे. 2 / 8इरेडाचा शेअर आपल्या 32 रुपयांच्या आयपीओ प्राइसवरून 6.5 पटहून अधिकने वधारला असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी 204.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. तर 49.99 रुपये हा या शेअरचा निचांक आहे.3 / 8इश्यू प्राइसपेक्षा 520% ने वधारला शेअर - इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा आयपीओ प्राइस बँड 30-32 रुपये होता. कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी खुला झाला होता आणि 23 नोव्हेंबरपर्यंत ओपन होता. कंपनीचा शेअर 29 नोव्हेंबर 2023 रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. 4 / 8लिस्टिंग झाल्यापासून इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी आहे. इरेडाचा शेअर आपल्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 520 टक्क्यांपेक्षाही अधिक वधारला आहे. इरेडाच्या पब्लिक इश्यूची एकूण साइज 2150.21 कोटी रुपये एढी आहे.5 / 847 पैकी 31 दिवस वधारला आहे शेअर - लिस्टिंगनंतर 47 दिवस इरेडाच्या शेअरचे ट्रेडिंग झाले. 47 ट्रेडिंग सेशन्सपैकी 31 दिवस हा शेअर वधारला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, तब्बल 15 म्यूचुअल फंड्सची या सरकारी कंपनीमध्ये 2.87 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. तर कंपनीमध्ये सरकारचा वाटा 75 टक्के एवढा आहे. 6 / 8इरेडाचा आयपीओ एकूण 38.80 पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्सचा कोटा 7.73 पट सब्सक्राइब झाला. तसेच, नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्सच्या कॅटेगिरीत 24.16 पट सब्सक्राइब झाला होता. क्वॉलीफाइड इंस्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 104.57 पट सब्सक्राइब झाला होता.7 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications