Share market Adani Group's Adani power share bumper return of 300 percent paid in 10 months
अदानी समूहाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; 10 महिन्यांत दिला 300% चा बंपर परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 10:03 PM1 / 7हिंडेनबर्गच्या झटक्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अदानी पॉवर हा सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरला आहे. गेल्या 10 महिन्यांत अदानी पॉवरचा शेअर 300% पेक्षाही अधिक वधारला आहे. 2 / 7या काळात कंपनीचा शेअर 132 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अदानी पॉवरच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 589.30 रुपये एवढा आहे. तर, नीचांक 132.55 रुपये एवढा आहे.3 / 7कंपनीच्या शेअरनं घेतली 300% हून अधिकची उसळी- अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 10 महिन्यांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 28 फेब्रुवारी 2023 रोजी 132.55 रुपयांवर होते. ते 7 डिसेंबर 2023 रोजी 562.05 रुपयांवर बंद झाला. या काळात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 305 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.4 / 7जर एखाद्या व्यक्तीने 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य 4.24 लाख रुपये झाले असते.5 / 75 महिन्यांत 135% हून अधिकची तेजी - अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 5 महिन्यांत 135% हून अधिकची वाढ झाली आहे. 13 जुलै 2023 रोजी अदानी पॉवरचा शेअर 237.35 रुपयांवर होते. तो 7 डिसेंबर 2023 रोजी 562.05 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांत अदानी पॉवरच्या शेअरमध्ये जवळपास 102% वाढ झाली आहे.6 / 7तसेच, गेल्या एका महिन्याचा विचार करता, अदानी पॉवरचा शेअर 43 टक्क्यांनी वधारले आहेत. अदानी पॉवरचा शेअर 8 नोव्हेंबर 2023 रोजी 393.85 रुपयांवर होते. जे आता 562.05 रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी पॉवरचे मार्केट कॅपही 216779 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications