बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:52 IST
1 / 8शेअर बाजारातील मल्टीबॅगर कंपनी बजाज फायनान्सचे शेयर या वर्षात आतापर्यंत 33% हून अधिकने वधारले आहेत. या शेअरच्या जबरदस्त कामगिरीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती या वर्षात आतापर्यंत जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. तसेच, बजाज फायनान्सचे मार्केट कॅपही 6 लाख कोटीरुपयांच्या जवळ पोहोचले आहे. 2 / 8ब्रोकरेज हाऊस, बजाज समूहाच्या या कंपनीवर बुलिश आहेत. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअरसाठी 11,000 रुपयांपेक्षाही अधिकचे टार्गेट दिले आहे. महत्वाचे म्हणजे, बजाज फायनान्सच्या शेअरने गेल्या 15 वर्षांत 22000% हून अधिकचा छप्परफाड परतावा दिला आहे.3 / 8एलारा कॅपिटलने दिले 11,161 रुपयांचे टार्गेट - ब्रोकरेज हाऊस एलारा कॅपिटलने बजाज फायनान्सच्या शेअर्स साठी 11,161 रुपयांचे टार्गेट दिले आहे. कंपनीचे शेअर पुन्हा एकदा चांगली कामगिरीक करताना दिसत आहेत, असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.4 / 8विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने (CLSA) बजाज फायनान्सच्या शेअर्ससाठी 11000 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. व्हेंचुरा सिक्योरिटीजने 10205 रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे. यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने एका वृत्तात माहिती दिली आहे. 5 / 815 वर्षांत 22000% हून अधिकचा परतावा - बजाज फायनान्सचे (Bajaj Finance) शेअर गेल्या 15 वर्षांत 22150 टक्क्यांच्या जवळपास वधारले आहेत. हा शेअर 30 एप्रिल 2010 रोजी 41.56 रुपयांवर होता. तो 22 एप्रिल 2025 रोजी BSE वर 9246.80 रुपयांवर बंद झाला आहे. 6 / 8गेल्या 10 वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 2137% ची तेजी दिसून आली आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांत कंपनीचा शेअर 367 टक्क्यांहून अधिकने वधारला. या कालावधीत कंपनीचा शेअर 1976 रुपयांवरून 9200 रुपयांवर पोहोचला आहे. 7 / 8या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9391.15 रुपये तर नीचांक 6376.55 रुपये एवढा आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)