शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market Beginners: शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीय? सट्टा का संधी? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 12:55 PM

1 / 7
शेअर बाजार म्हणजे सट्टा असे जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. प्रत्यक्षात बाजार म्हणजे गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असून एक अभ्यासाचा विषय सुध्दा आहे. मिळविते झाल्यावर शेअरबाजारात कमी वयातच प्रवेश केल्यास आणि किमान १५ ते २५ वर्षांचा विचार करून दरमहा सातत्याने न चुकता चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास आपल्या रिटायरमेंटचे नियोजन निश्चित झाले, असे समजा
2 / 7
दीर्घकालीन गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळविण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि जिद्द हे गुण आवश्यक आहेत. बाजारात चढउतार राहणे हे सुदृढ बाजाराचे लक्षण असते. यात बाजार खाली आला तर चित्त विचलित करू न देता खालच्या भावात चांगले शेअर्स खरेदी करण्याची वृत्ती असावी. बाजार वाढलेला असताना फायदा आहे, म्हणून शेअर्स विकू नयेत. कारण ते दीर्घ काळासाठी ठेवल्याने त्याचे फायदेही अधिक असतात. योग्य शब्दांत सांगायचे तर इन्व्हेस्टर बना ट्रेडर नको.
3 / 7
सन २०२२ या नवीन वर्षात भविष्यातील  फायनान्शियल फ्रिडम मिळविण्यासाठी एक संकल्प करा. गुंतवणुकीच्या अनेक पर्याय निवडताना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यास सुरवात करा. (क्रमशः)
4 / 7
आपल्या मासिक वेतनातून अशी रक्कम प्रत्यक्ष महिन्याला बाजूला काढा जी आपणास नजीकच्या काळात लागणार नाही आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता.
5 / 7
प्रथम अधिकृत ब्रोकर मार्फत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून डिमॅट अकाउंट सुरु करा. शेअर बाजाराचा प्राथमिक अभ्यास करा. 
6 / 7
बाजराशी निगडित महत्वाच्या कन्सेप्ट्स जाणून घ्या. विविध क्षेत्रांतील उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या निवडा. प्रत्येक महिन्यात शेअर्स खरेदी करून दीर्घ काळासाठी ठेवा.
7 / 7
पोर्टफोलिओ म्हणजे  आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये आपण  विकत घेतलेले शेअर्स. या पोर्टफोलिओ मध्ये विविध क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर्स असावेत. याचे कारण असे की, एखादे क्षेत्र मंदीत असेल तर दुसरे तेजीत असते.
टॅग्स :share marketशेअर बाजार