शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका! १५ दिवसांत ११०० कोटी बुडाले; पाहा, शेअर्सची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 7:10 PM

1 / 12
गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये कभी खुशी, कभी गमचे वातावरण पाहायला मिळाले.
2 / 12
शेअर मार्केटमधील बिग बुल Rakesh Jhunjhunwala यांना मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील पहिल्या १५ दिवसांत मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे झुनझुनवाला दाम्पत्याला मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
3 / 12
Rakesh Jhunjhunwala यांच्यासाठी एप्रिलचा महिना निराशाजनक ठरत आहे. शेअर बाजारातील पडझडीने राकेश झुनझुनवाला यांना जवळपास ११०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
4 / 12
मात्र, Rakesh Jhunjhunwala यांची स्टार हेल्थमध्ये १७.५ टक्के हिस्सेदारी आहे. १६ मार्च २०२२ पासून हा शेअर तब्बल २० टक्क्यांनी वधारल्याने राकेश झुनझुनवालांना बक्कळ फायदा झाला आहे.
5 / 12
Rakesh Jhunjhunwala आणि रेखा झुनझुनवाला यांनी जवळपास ३५ कंपन्यांमध्ये १ टक्क्याहून अधिक हिस्सा प्राप्त केला आहे. ज्यात टायटन कंपनीमध्ये झुनझुनवाला दाम्पत्याचा ५.१ टक्के हिस्सा आहे. टायटनच्या शेअरमध्ये एप्रिल महिन्यात जवळपास ३ टक्के घसरण झाली.
6 / 12
Rakesh Jhunjhunwala दाम्पत्याचे गुंतवणूक मूल्य ११ हजार १०६ कोटी ९० लाख आहे. टायटनच्या शेअरबाबत विश्लेषकांनी सकारात्मक अंदाज वर्तवले आहेत.टायटनचा शेअर २,५४३ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7 / 12
Rakesh Jhunjhunwala प्रवर्तक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सच्या शेअरने मात्र तेजी दर्शवली. चालू महिन्यात स्टार हेल्थचा शेअर ३ टक्क्यांनी वधारला. झुनझुनवाला यांची स्टार हेल्थमध्ये १७.५ टक्के हिस्सेदारी आहे.१६ मार्च २०२२ पासून हा शेअर तब्बल २० टक्क्यांनी वधारला आहे.
8 / 12
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. स्टार हेल्थमध्ये झुनझुनवालांची एकूण गुंतवणूक ७ हजार ३९२ कोटी ३० लाख इतकी झाली आहे.
9 / 12
Rakesh Jhunjhunwala आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ १३ एप्रिल २०२२ अखेर ३२ हजार ६६७ कोटींपर्यंत खाली आला आहे. ३१ मार्चअखेर या पोर्टफोलिओचे मूल्य ३३ हजार ७५४ कोटी इतके होते. मात्र झुनझुनवाल्यांच्या इक्विटी गुंतवणूक पोर्टफोलित एप्रिल महिन्यात तब्बल १०८४ कोटींची घसरण झाली आहे.
10 / 12
मेट्रो ब्रॅंड या शेअरमध्ये रेखा झुनझुनवाला यांची १४.४ टक्के गुंतवणूक आहे. मेट्रो ब्रॅंडचा शेअर एप्रिल महिन्यात २.९ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र त्यापूर्वी वर्षभरात हा शेअर जवळपास ३३ टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी रेखा झुनझुनवाला यांचे गुंतवणूक मूल्य २ हजार ३६० कोटी ८० लाख इतके आहे.
11 / 12
Rakesh Jhunjhunwala यांची टाटा मोटर्समध्ये १.२ टक्के हिस्सेदारी आहे.या शेअरमध्ये या महिन्यात घसरण झाली आहे. याशिवाय राकेश झुनझुनवाला दाम्पत्याची क्रिसील या शेअरमध्ये ३१ डिसेंबर २०२१ अखेर ५.५ टक्के हिस्सेदारी आहे. ज्याचे गुंतवणूक मूल्य १ हजार ३३९ कोटी आहे.
12 / 12
क्रिसीलचा शेअर मात्र एप्रिल महिन्यात २.५ टक्क्यांनी वधारला आहे. ब्रोकर्स आणि शेअर बाजार विश्लेषकांच्या नजीकच्या काळात क्रिसीलच्या शेअरमध्ये मोठी वाढ नोंदवण्याची क्षमता आहे. हा शेअर सध्याच्या पातळीच्या तुलनेत ११ टक्क्यांपर्यंत आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार