शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹117 वरून आपटून थेट ₹21 वर आला हा शेअर! आता खरेदी साठी उडालीय झुंबड, 2 फेब्रुवारीला मोठी बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 6:44 PM

1 / 9
शेअर बाजारात बुधवारी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडच्या ​शेअरने जबरदस्त उसळी घेतली आहे. हा शेअर बुधवारी 17.5 टक्क्यांनी वधारून 21.08 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.
2 / 9
या शेअरमध्ये आलेल्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. खरे तर, आपल्या बोर्ड मेंबर्सची 2 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. असे ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडने शेअर बाजारला सांगितले आहे.
3 / 9
काय म्हणाली कंपनी? - ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडने मंगळवारी सायंकाळी स्टॉक एक्सचेन्ज बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, 02 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात कल्लोल सेन यांच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी पूर्णवेळ (कार्यकारी) संचालक म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात विचार केला जाईल आणि त्याला मान्यता दिली जाईल.
4 / 9
ते सध्या मोट्स अँड बॉट्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, बिझनेस संदर्भात इतरही काही निर्णय घेतले जाऊ शकतात.
5 / 9
अशी आहे कंपनीच्या शेअर्सची स्थिती - ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या काही सत्रांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत १२% आणि या वर्षी YTD मध्ये आतापर्यंत ७% ने वधारले आहेत. मात्र असे असले तरी, गेल्या सहा महिन्यांत त्यात 23% ने घसरण झाली आहे. तसेच वर्षभरात 20% ची घसरण झाली आहे.
6 / 9
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडचा शेअर 5 वर्षात 1,302.78% ने वाढला आहे. या कालावधीत त्याची किंमत 1.44 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. 17 डिसेंबर 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 117.66 रुपये होती. यानुसार हा शेअर 83% पर्यंत घसरला आहे.
7 / 9
कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 36.82 रुपये तर निचांक 9.27 रुपये एवढा आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 4,098.40 कोटी रुपये एवढे आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा