शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market Change: शेअर बाजारात उद्यापासून मोठा बदल; आधीपेक्षा दुप्पट फायदा होणार... धक्का बसण्यापूर्वी पहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 5:34 PM

1 / 9
देशाच्या शेअर मार्केटमध्ये उद्यापासून एक मोठा बदल होणार आहे. हा बदल एवढा क्रांतीकारक असेल की जगातील सर्वात फास्ट शेअर बाजारांपैकी एक ठरणार आहे. सर्व शेअर्स टी+2 हून टी+1 सेटलमेंटमध्ये बदलले जाणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर शेअर्सचा व्यवहार हा आधीपेक्षा फास्ट होणार आहे.
2 / 9
शेअर्सच्या व्यवहारासोबतच पैसे देखील लगेचच वळते केले जाणार आहेत. म्हणजे तुम्ही शेअर्स सकाळी विकले तर संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत.
3 / 9
ही प्रक्रिया एकदा अंमलात आल्यावर भारत जगातील सर्वात प्रगतीशील आणि पारदर्शक इक्विटी बाजारांपैकी एक होईल. यामुळे बाजारातील लिक्विडीटी वाढू शकते आणि मार्जिनची गरजही कमी होण्याची अपेक्षा आहे.
4 / 9
सध्या अस्तित्वात असलेल्या T+2 सेटलमेंट अंतर्गत गुंतवणूकदार आज शेअर खरेदी करत असेल, तर तो त्याच्या डिमॅट खात्यात ४८ तासांत हस्तांतरित केला जात होता. शेअर विकल्यावर देखील पुढच्या ४८ तासांत ती रक्कम वळती केली जात होती.
5 / 9
यामुळे दुसऱ्या दिवशी खरेदी करण्यासाठी लोकांना अधिकच्या पैशांची गरज भासत होती. यामुळे भांडवल जास्त लागत होते. नवीन प्रणाली त्याच दिवशी पैसे ट्रान्सफर करणार असल्याने त्याच पैशांत दुसऱ्या दिवशी गुंतवणूक करता येणार आहे. तसेच जे पैसे दुसऱ्या दिवशी लागत होते त्यांचा आणखी गुंतवणूक करण्यासाठी फायदा घेता येणार आहे.
6 / 9
पूर्वी T+3 ची प्रणाली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात शेअर्स किंवा पैसे जमा होण्यासाठी ४८ तासांहून अधिक काळ लागत होता. नवीन T+1 सेटलमेंट सुरू केल्यामुळे, शेअर्स खरेदी केल्याच्या एका दिवसात गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात येतील.
7 / 9
विक्रीची रक्कम देखील 24 तासांच्या आत खात्यात जमा केली जाईल. म्हणजेच सकाळी शेअर बाजारात शेअर्स विका आणि संध्याकाळी घरी येईपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील.
8 / 9
केतन पारेख घोटाळ्यानंतर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) भारतीय शेअर बाजार अधिक पारदर्शक आणि गुंतवणूकदारांना अनुकूल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
9 / 9
T+1 गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लागू करण्यात आली होती. बाजार मूल्यानुसार 100 सर्वात लहान समभागांमध्ये लागू करण्यात आली होती. ती आता सर्व शेअर्सवर लागू केली जाणार आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजार