शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात धमाका! पहिल्याच दिवशी ₹85 रुपयांचा शेअर ₹180 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:03 PM

1 / 9
क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सच्या शेअरने शेअर बाजारात पहिल्याच दिवशी धमाका केला आहे. या शेअरची बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. हा शेअर 105 टक्क्यांहून अधिकच्या नफ्यासह 175 रुपयांवर लिस्ट झाला.
2 / 9
आयपीओमध्ये हा शेअर गुंतवणूकदारांना केवळ 85 रुपयांना मिळाला होता. आता या शेअरने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांचा पैसा लिस्टिंगच्या दिवशीच दुप्पट झाला आहे.
3 / 9
क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सचा आयपीओ 28 मार्चला झाला होता. तो 4 एप्रिल 2024 पर्यंत खुला होता.
4 / 9
शेअरमध्ये तुफान तेजी - लिस्टिंगनंतर लगेचच शेअरच्या किंमतीत जबरदस्त तेजी दिसून आली. हा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 183.75 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर 174 रुपयांच्या निचांकी पातळीवरही गेला होता.
5 / 9
क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेन्जच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाला आहे. कंपनीच्या पब्लिक इश्यूची टोटल साइज 54.40 कोटी रुपयांपर्यंत होती.
6 / 9
क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सचा आयपीओ एकूण 201.86 पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा कोटा 144.63 पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन-इंस्टीट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) कोट्यात 472.85 पट सब्सक्राइब झाला होता. तर क्वॉलीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 98.79 पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स 1 लॉट खरेदी करू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर आहेत.
7 / 9
काय करते कंपनी? - क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सची सुरवात 2014 मध्ये झाली. कंपनी डिजिटल फ्लॅक्सो प्लेट्स, कन्व्हन्शनल फ्लॅक्सो प्रिंटिंग प्लेट्स, लेटर प्रेस प्लेट्स, मेटल बॅक प्लेट्स आणि कोटिंग प्लेट्स तयार करते. कंपनीच्या दोन उपकंपन्या देखील आहेत.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक