Share market cupid limited stock soared more than 10000 percent in 10 year
मल्टीबॅगर शेअची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! 10 वर्षांत दिला 10000% चा बम्पर परतावा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 6:38 PM1 / 8कंडोम उत्पादक कंपनी असलेल्या क्युपिड लिमिटेडच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीचा शेअर 10,000% हून अधिकने वधारला आहे. या काळात, हा शेअर 8 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 2 / 8क्युपिड लिमिटेडचा शेअर 10 नोव्हेंबर 2023 रोजी 818 रुपये, या 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 228.20 रुपये एवढा आहे. क्युपिड लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 72% चा परतावा दिला आहे.3 / 81 लाखाचे केले 1 कोटी रुपये - क्युपिड लिमिटेडचा शेअर गेल्या 10 वर्षांत तब्बल 10036 टक्क्यांनी वधारला आहे. क्युपिडचा शेअर 22 नोव्हेंबर 2013 रोजी 8.07 रुपयांवर होता. तो 10 नोव्हेंबर 2023 रोजी 818 रुपयांवर बंद झाला. 4 / 8जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी क्युपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य 1.03 कोटी रुपये झाले असते. 5 / 8साडेतीन वर्षांत 481 टक्क्यांचा परतावा - क्युपिड लिमिटेडचा शेअर गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत 481 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 140.75 रुपयांवर होता. तो 10 नोव्हेंबर 2023 रोजी 818 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, गेल्या एका वर्षात या शेअरने 227 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 6 / 8कंपनीचा शेअर 14 नोव्हेंबर 2022 रोजी 250.70 रुपयांवर होता. तो 10 नोव्हेंबर 2023 रोजी 818 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 215 टक्क्यांची तेजी आली आहे. तसेच, गेल्या एका महिन्याचा विचार करता, क्युपिड लिमिटेडच्या शेअरमध्ये 72 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.7 / 8 (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8 (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications