शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छप्परफाड रिटर्न! फक्त १५ हजार गुंतवून कमावले १ कोटी; २ ₹च्या शेअर १३८० ₹वर, तुम्ही घेतलाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 3:59 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. कधी शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात एकदम घसरतो, तर कधी सावरत पुन्हा विक्रमाकडे झेपावतो. या परिस्थितीत नेमक्या कोणत्या शेअरवर आपले लक्ष असले पाहिजे, याबाबत अनेक तज्ज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
2 / 9
दुसरीकडे, शेअर बाजाराची स्थिती काहीही असली, तरी काही कंपन्या आपल्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. यापैकी असाच एक शेअर आहे, ज्याने गुंतवणूकदारांना भन्नाट परतावा देऊन मालामाल केले आहे.
3 / 9
गेल्या दोन दशकांत गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये हॅवेल्स इंडियाचे नाव समाविष्ट आहे. सन २००१ पासून आता या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना ७२,९२६.४६ टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. हॅवेल्स इंडियाचे शेअर्स २३ मार्च २००१ रोजी १.८९ रुपयांना सूचीबद्ध झाले.
4 / 9
०६ सप्टेंबर २०२२ रोजी हॅवेल्सचे शेअर्स NSE वर रु. १,३८०.२० वर बंद झाला. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ८६.३५ हजार कोटी रुपये आहे आणि ती एक लार्ज-कॅप कंपनी आहे.
5 / 9
सन १९५८ मध्ये सुरू झालेली कंपनी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी घरगुती उपकरणे, प्रकाश उपकरणे, एलईडी लाइटिंग, पंखे, मॉड्यूलर स्विचेस आणि वायरिंग अॅक्सेसरीज, वॉटर हीटर्ससह अनेक उत्पादनांची निर्मिती करते. हॅवेल्स इंडियाचे शेअर्स गेल्या एका महिन्यात ५.८२ टक्क्यांनी वधारले.
6 / 9
त्याचप्रमाणे गेल्या ६ महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना २८ टक्के परतावा दिला आहे. हॅवेल्सचा स्टॉक एका वर्षात ४.४२ टक्क्यांनी घसरला आहे. आतापर्यंत हॅवेल्स इंडियाच्या शेअर्सने लिस्ट झाल्यापासून गुंतवणूकदारांना ७२,९२६.४६ टक्के परतावा दिला आहे.
7 / 9
म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने २३ मार्च २००१ रोजी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत कायम ठेवले असतील तर आज त्याचे गुंतवणुकीचे मूल्य ७.२९ कोटी रुपये झाले आहे. एवढेच नाही तर २३ मार्च २०२१ रोजी जर एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त १५ हजार रुपये गुंतवले असते तर आज तो करोडपती झाला असता आणि त्याचे १५ हजार रुपये १.०९ कोटी रुपये झाले असते.
8 / 9
विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात या समभागाने १८२ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर तो आज ३.८२ लाख रुपयांचा मालक झाला असेल.
9 / 9
आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत Havells India Limited चा नफा ३.४७ टक्क्यांनी वाढून २४२.४३ कोटी झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे कंपनीचा वार्षिक महसूल देखील गत आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. २,५९८.२ कोटींच्या तुलनेत ६२.८ टक्के वाढून रु. ४,२३०.१ कोटी झाला.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक