Share market jewellery company stock price high while gold price down
गोल्ड नव्हे, या 'Golden' कंपन्यांनी दिलाय बंपर परतावा, केवळ 5 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 4:07 PM1 / 8एकीकडे सोन्याची किंमत कमी होत असतानाच, दुसरीकडे मात्र, ज्वैलरी कंपन्यांचे शेअर रॉकेट बनताना दिसत आहेत. गेल्या पाच दिवसांत या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. 2 / 8गेल्या मंगळवारी म्हणजे 23 जुलैला, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोन्याची किंमत घसरली.3 / 8सोमवारी 22 जुलैरोजी मार्केट खुले झाले तेव्हा सोन्याचा दर 73161 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. शुक्रवार मार्केट बंद झाले तेव्हा हा दर 68160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. अर्थात या पाच दिवसांत सोन्याचा भाव जवळपास 5 हजार रुपयांनी घसरला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा भाव जवळपास 4 हजार रुपयांनी घसरला होता. 4 / 8आता ज्वेलर्स कंपन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कंपन्यांनी गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अनेक कंपन्यांनी या पाच दिवसांत 5 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर काहींचा परतावा 22 टक्क्यांहूनही अधिक होता. 5 / 8अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने सोन्याऐवजी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर, त्याला सोन्यापेक्षाही अधिक परतावा मिळाला असता.6 / 8पीसी ज्वेलर लिमिटेड - या कंपनीच्या शेअरने गेल्या 15 दिवसांत (सोमवार ते शुक्रवार) गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने या कालावधीत सुमारे 23 टक्के एवढा परतावा दिला आहे. 22 जुलै रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 69.83 रुपये एवढी होती. ती आता 85.81 रुपयांवर पोहोचली आहे. जर आपण पाच दिवसांपूर्व कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते तर आता आपल्याला सुमारे 23 हजार रुपयांचा नफा झाला असता.7 / 8राधिका ज्वेलटेक लिमिटेड - गेल्या 5 दिवसांत या कंपनीनेही चांगला परतावा दिला आहे. या कंपनीने गेल्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 22 जुलैला या कंपनीच्या शेअरची किंमत 57.30 रुपये होती. ती आता वाढून 70 रुपयांवर पोहोचली आहे. जर आपण पाच दिवसांपूर्व कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते तर आता आपल्याला सुमारे 22 हजार रुपयांचा नफा झाला असता.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications