शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 3 दिवसांत 45 टक्क्यांनी वाढला बँकेचा शेअर, रिझल्टनंतर घेतलाय रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 6:47 PM

1 / 8
सप्टेंबर 2022 च्या तिमाही रिझल्टने कर्नाटक बँकेच्या शेअर्सना जबरदस्त बुस्ट दिला आहे. कर्नाटक बँकेचे (Karnataka Bank) शेअर्स केवळ 3 महिन्यांतच 45% वधारले आहेत. शुक्रवारी बँकेचे शेअर्स 19% वाढून 143 रुपयांवर पोहोचले आहेत.
2 / 8
ट्रेडिंगच्या शेवटी कर्नाटक बँकचा शेअर 14 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 138.05 रुपयांवर बंद झाला आहे. बँकेच्या शेअरचा 52 आठवड्यांतील हाय 143 रुपये आहे. तर, कर्नाटक बँकेच्या शेअरचा 52 आठवड्यांतील लो लेव्हल 55.25 रुपये आहे.
3 / 8
3 दिवसांत 93 रुपयांवरून 135 रुपयांवर पोहोचला शेअर - कर्नाटक बँकेचे शेअर्स 1 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 93.75 रुपयांच्या पातळीवर होते. ते 4 नोव्हेंबर 2022 रोजी 138.05 रुपयांवर बंद झाले. अर्थात, कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये 3 ट्रेडिंग सत्रांत 43 रुपयांची वाढ झाली आहे.
4 / 8
गेल्या एका महिन्यातच कर्नाटक बँकेच्या शेअरने जवळपास 65 टक्क्यांची उसळी घेतली आहे. तसेच, तसेच या वर्षाचा विचार केल्यास, या शेअरमध्ये आतापर्यंत 118 टक्क्यांची तेजी आली आहे. तर, गेल्या 6 महिन्यांत बँकेचा शेअर 113 टक्क्यांनी वाढला आहे.
5 / 8
बँकेला सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 411 कोटी रुपयांचा नफा - चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेला 411.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा कर्नाटक बँकेचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. या बँकेच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 228% वाढ झाली आहे.
6 / 8
गेल्या वर्षीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेला 125.45 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कर्नाटक बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 525.52 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. हा खाजगी बँकेचा सहामाहीतील आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे.
7 / 8
एप्रिल-जून 2022 तिमाहीत कर्नाटक बँकेला (Karnataka Bank) 114.18 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जूनच्या तिमाहीत कर्नाटक बँकेचा रेव्हेन्यू 1629.08 कोटी रुपये होता. हा सप्टेंबर 2022 तिमाहीत वाढून 1771.05 कोटी रुपये झाला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक