शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:39 PM

1 / 7
शेअर बाजारात इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित कंपनी मार्सन्स लिमिटेडच्या शेअरने यावर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. डिसेंबर 2023 मध्ये ₹7 वर असलेल्या या शेअरने 2024 मध्ये जवळपास 602 टक्के एवढा परतावा दिला.
2 / 7
या शेअरची किंमत सध्या 2 टक्क्यांनी वाढून 54.38 रुपयांवर पोहोचली आहे. हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 831 टक्क्यांहून अधिक वधारला. जुलै 2023 मध्ये या शेअरची किंमत 4.95 रुपये होती, हा 52 आठवड्यांचा नीचांकी आहे.
3 / 7
सलग 5व्या महिन्यात पॉझिटिव्ह परतावा - मार्सन्स लिमिटेडच्या शेअरने या वर्षात आतापर्यंतच्या 5 ही महिन्यांत पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. एप्रिल महिन्यात या शेअरने 37 टक्के, मार्चमध्ये 39 टक्के, फेब्रुवारी महिन्यात 45 टक्के तर जानेवारी महिन्यात तब्बल 135.5 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच आता सुरू असलेल्या मे महिन्यात या शेअरने आतापर्यंत 8 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
4 / 7
दीर्घ कालावधीतही मार्सन्स लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या शेअरने गेल्या 3 वर्षांत 447 टक्क्यांहून अधिक, तर गेल्या 5 वर्षांत 543 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
5 / 7
काय करते कंपनी - मार्सन्स लिमिटेड भारतात वीज आणि वितरण ट्रान्सफार्मर्सचे उत्पादन, पुरवठा, कमीशनिंगमध्ये सक्रीय आहे. ही कंपनी 10 केव्हीए ते 160 एमव्हीए आणि 220 केव्हीपर्यंतचे वीज आणि वितरण ट्रान्सफार्मरचा पुरवठा करते.
6 / 7
मार्सन्स लिमिटेडची स्थापना 1976 मध्ये झाली असून ती कोलकात्यात आहे. डिसेंबर तिमाहीत मार्सनचा नफा 74.58 टक्क्यांनी घसरून ₹0.15 कोटी झाला. तर वार्षिक विक्रीही 64.5 टक्क्यांनी घसरून ₹0.65 कोटीवर आली आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक