share market mtnl share soared 80 percent in only 7 days stock rallied 287 percent in just one year
रॉकेट बनलाय या सरकारी कंपनीचा शेअर...! अवघ्या 7 दिवसांत 80% वधारला, एका वर्षात एवढा बंपर परतावा दिला By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 5:15 PM1 / 8महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (MTNL) शेअरमध्ये तुफान तेजी दिसत आहे. हा शेअर सोमवारी 10 टक्क्यांच्या तेजीसह 76.25 रुपयांवर पोहोचला आहे. एमटीएनएलच्या शअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. 2 / 8हा शेअर शुक्रवारी 69.32 रुपयांवर बंद झाला होता. हा शेअर 7 दिवसात 80% हूनही अधिक वधारला आहे. जास्त वाढला आहे. एमटीएनएल शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.37 रुपये आहे.3 / 87 दिवसांत 80% ची उसळी - महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा शेअर अवघ्या 7 दिवसांत 80 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. 11 जुलै 2024 रोजी एमटीएनएलचा शेअर 42.30 रुपयांवर होता. तो 22 जुलै 2024 रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. 4 / 8MTNL चा शेअर गेल्या 5 दिवसांत 61% ने वधारला आहे. 15 जुलै 2024 रोजी कंपनीचा शेअर 47.38 रुपयांवर होता. तो 22 जुलै रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. MTNL चा शेअर्स 13 दिवसात 90% ने वधारला आहे. या काळात कंपनीचा शेअर 40 रुपयांवरून 76 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 5 / 8एका वर्षात दिला 287% परतावा - महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या शेअरने गेल्या एका वर्षात 287% चा परतावा दिला आहे. टेलिकॉम कंपनीचा शेअर 24 जुलै 2023 रोजी 19.74 रुपयांवर होता, जो 22 जुलै 2024 रोजी 76 रुपयांच्याही वर गेला आहे. 6 / 8या वर्षात आतापर्यंत एमटीएनएलचा शेअर जवळपास 130% ने वाधारला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी टेलिकॉम कंपनीचा शेअर 33.23 रुपयांवर होते. जो 22 जुलै 2024 रोजी 76.25 रुपयांवर पोहोचला. गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा शेअर (MTNL) 120% ने वधारला आहे.7 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications