शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹7 वरून 1600वर पोहोचला हा मल्टीबॅगर स्टॉक, दिला 24000% चा ढासू परतावा; मालक वाढवतायत हिस्सेदारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:13 PM

1 / 7
शेअर बाजारात अभियांत्रिकी कंपनी जीएमएम फोडलरच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 20 वर्षांत कंपनीचा शेअर 24,000% हूनही अधिकने वधारला आहेत. मल्टीबॅगर कंपनी असलेल्या GMM Pfaudler चे शेअर्स या काळात 7 रुपयांवरून 1600 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
2 / 7
कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1999 रुपये एवढा आहे. जीएमएम फोडलरचे प्रमोटर असलेले पटेल कुटुंब आता कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवत आहे. पटेल कुटुंब GMM Fodler मध्ये आणखी 1% स्टेक खरेदी करत आहे. आता या कंपनीतील पटेल कुटुंबाची हिस्सेदारी 25.18 टक्के असेल. सीएनबीसी-टीव्ही-18 ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
3 / 7
शेअर्समध्ये 24000% हून अधिकची तेजी - जीएमएम फॉडलरचा शेअर 14 नोव्हेंबर 2003 रोजी 6.93 रुपयांवर होता. तो 13 नोव्हेंबर 2023 रोजी 1679 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 24127% ने वाढ झाली आहे.
4 / 7
जर एखाद्या व्यक्तीने 14 नोव्हेंबर 2003 रोजी जीएमएम फोडलरच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता या शेअरचे मूल्य 2.42 कोटी रुपये झाले असते.
5 / 7
10 वर्षांत 7000% परतावा - जीएमएम फॉडलरच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत 7000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 14 नोव्हेंबर 2013 रोजी 23.37 रुपयांवर होता. तो 13 नोव्हेंबर 2023 रोजी 1679 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 7000% ने वाढ झाली आहे.
6 / 7
जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असीत, तर आतात्याचे मूल्य 71.84 लाख रुपये झाले असते. गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 390 टक्क्यांची वाढ झाली आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक