शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात रिटर्न! १ लाखाचे झाले ७.३२ कोटी; १₹च्या शेअरने दिला छप्परफाड परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:30 AM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची स्थिती अधिकच अनिश्चित झालेली पाहायला मिळत आहे. अलीकडेच उच्चांकी पातळी गाठलेल्या शेअर बाजारात अचानक प्रचंड मोठी घसरण झाली आणि हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक आणखी जोखमीची झाल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
एकीकडे शेअर बाजाराची पडझड सुरू असतानाच एका कंपनीने दमदार कामगिरी करत आपल्या गुंतवणूकदारांना कमाल परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखीमीचे असले तरी योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. अनेक शेअर असे आहेत ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूकीतून गुंतवणूकदारांना श्रीमंत केले.
3 / 9
आरती इंडस्ट्रीज लिमिटेड ही रासायनिक उद्योग क्षेत्रातील एक लार्ज-कॅप कंपनी आहे. आरती इंडस्ट्रीज लिमिटेड (AIL) ही जागतिक बाजारपेठेत आघाडीची फार्मास्युटिकल्स आणि विशेष रसायने उत्पादक कंपनी आहे. या शेअरने गेल्या २३ वर्षात १ लाख रुपयांची गुंतवणूक ७.३२ कोटी रुपयांमध्ये रूपांतरित केली आहे.
4 / 9
आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अशी रसायने तयार करते जी फार्मास्युटिकल्स, अॅग्रोकेमिकल्स, पॉलिमर, अॅडिटीव्ह, रंगद्रव्ये आणि रंगांच्या उत्पादनात वापरली जातात. कंपनीची सध्याची मार्केट कॅप २८,६८८.५७ कोटी रुपये आहे.
5 / 9
आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स ८१९.८५ रुपयांच्या बाजारभावावर व्यवहार करत आहेत. १ जानेवारी १९९९ रोजी शेअरची किंमत १.०८ रुपये होती. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता सुमारे ७.३२ कोटी रुपये झाले असते.
6 / 9
पाच वर्षांपूर्वी १ सप्टेंबर २०१७ रोजी या शेअरची किंमत २११.५६ रुपये होती शेअरने भागधारकांना पाच वर्षांत २७३.७९ टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या १ वर्षात शेअरमध्ये १३.१८ टक्के घसरण झाली आहे.
7 / 9
शेअरने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी १,१६८.०० रुपयांचा या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि रु. ६६८.८५ या ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला. ३० ऑगस्ट रोजी या कंपनीचा शेअर वधारला असून, बाजाराच्या पडझडीत या शेअरने उसळी घेतलेली आहे. सध्या या कंपनीचा शेअर १.२१ टक्क्यांच्या वाढीसह ८१९.८५ रुपयांवर व्यवहार करत आहे.
8 / 9
दरम्यान, महागाईविरुद्ध लढ्याच्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या कठोर सुराने जगभरातील बाजारात उमटलेल्या भीतीदायी प्रतिक्रियेने शेअर मार्केटचाही थरकाप उडविला. स्थानिक भांडवली बाजारात समभाग विक्रीचे वादळ उठल्याने, सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी जवळपास दीड टक्क्यांची मोठी घसरगुंडी अनुभवली, तर गुंतवणूकदारांना तब्बल २.३९ लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले.
9 / 9
पुन्हा प्रति डॉलर ८० पुढे ढेपाळलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० डॉलरपुढे कडाडलेल्या खनिज तेलाने सेन्सेक्स-निफ्टीच्या पडझडीला आणखी हातभार लावला. परिणामी, शेअर मार्केट दीड हजार अंशांपर्यंत कोसळला होता. पुढे तो सावरला तरी मागील आठवड्याच्या तुलनेत ८६१.२५ अंश खाली ५७,९७२.६२ या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. दुसरीकडे २४६ अंशांनी गडगडलेल्या निफ्टीचा १७,३१२.९० असा बंद स्तर राहिला.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक