शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर नाही, नोटा छापायचं मशीन! गुंतवणूकदारांची झाली चांदी, केवळ ₹50 हजार लावणारे बनले करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 9:31 AM

1 / 7
शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांनाचे नशीबच पालटले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लखपती थेट करोडपती बनले आहेत. या शेअर ने आपल्या गुतंवणूकदारांना छप्परफाड़ परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत.
2 / 7
या शेअरमध्ये 50 हजार रुपयांची गुतंवणूक करणाऱ्यांना तब्बल 1.30 कोटी रुपयांचा तगडा परतावा मिळाला आहे. सध्या या कंपनीचे शेअर विकायला कुणीही तयार नाही. या शेअरमध्ये अद्यापही तेजी दिसत आहे. तसेच या शेअरमध्ये आणखी तेजी बघायला मिळू शखते, असे गुतंवणूकदारांचे मत आहे.
3 / 7
गुंतवणूकदारांना केलं मालामाल - आम्ही ज्या शेअरसंदर्भात बोलत आहोत तो Dynacons Systems & Solutions Limited चा शेअर आहे. एंड-टू-एंड टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीसंदर्भातील सर्व्हिसेस पुरवते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुतंवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत 26 हजार टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
4 / 7
ज्या लोकांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली ते आज करोडपती बनले आहेत. गेल्या एका वर्षात हा शेअर 145 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. तर 6 महिन्यांत या शेअरने 70 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. हे शेअर गेल्या शुक्रवारी बीएसईवर 663 रुपयांवर बंद झाला.
5 / 7
गुंतवणूकदार असे बनले करोडपती - बीएसईवरील आकडेवारीनुसार, एक नोव्हेंबर 2013 मध्ये कंपनीचा शेअर केवळ 2.66 रुपयांवर होता. तो 1 नोव्हेंबर 2023 रोजी 694.45 रुपयांवर पोहोचला. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर आता तिचे मुल्य एक कटो रुपयांहूनही अधिक झाले असते.
6 / 7
या कालावधीत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 हजार टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक