शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock: गुंतवणूकदारांची लॉटरी! 9 महिन्यात 7 पट वाढला पैसा; 25 रुपयांचा शेअर रॉकेट बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 10:40 AM

1 / 9
शेअर बाजारात गुंतवणूक करणे भलेही जोखमीचे असेल, पण आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करणारेही अनेक शेअर्स आहेत. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे जीएम पॉलीप्लास्ट (G M PolyPlast). या स्टॉकने केवळ नऊ महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एप्रिल 2022 मध्ये या शेअरची किंमत केवळ 25 रुपये होती, आता हा शेअर 200 रुपयांच्याही पुढे गेला आहे.
2 / 9
2022 च्या शेवटच्या महिन्यात बनला रॉकेट - जीएम पॉलीप्लास्ट (G M PolyPlast) या प्लॅस्टिक उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची सध्या बल्ले-बल्ले सुरू आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत, म्हणजेच 2022 च्या शेवटच्या महिन्यात या शेअरला मिळालेला रॉकेट स्पीड अद्यापही कायम आहे.
3 / 9
या शेअरमद्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, या स्टॉकने आपल्या गुतंवणूकदारांना एकावर्षात 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 692 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
4 / 9
हा शेअर एप्रिल 2022 च्या सुरुवातीला केवळ 25 रुपयांवर होता. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत यात साधारण वाढ झाल्याचे दिसून आले आणि 16 सप्टेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 50 रुपयांवर पोहोचली. मात्र, गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या शेअरने रॉकेट स्पीड घेतला आणि 14 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 80 रुपयांवर पोहोचला.
5 / 9
नोव्हेंबरमध्ये पार केला 100 चा आंकडा - जीएम पॉलीप्लास्टच्या (G M PolyPlast) शेअरची तेजी इथेच थांबली नाही. तर नोव्हेंबर 2022 मध्ये या शेअरने 100 चा आकडाही ओलांडला. 25 नोव्हेंबरला हा शेअर 142 रुपयांवर पोहोचला. 30 डिसेंबरला हा शेअर 175 रुपयांवर गेला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवसात म्हणजेच शुक्रवारी हा शेअर टक्यांच्या वाढीसह 202 रुपयांवर पोहोचला आहे.
6 / 9
एक लाखाचे किती झाले? - जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहता, या शेअरमध्ये नऊ महिन्यांपूर्वी ज्यांनी कुणी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती टिकवून ठेवली असेल, त्याचे आज 7 लाखांपेक्षाही अधिक झाले असतील.
7 / 9
महत्वाचे म्हणजे, शेअर्समध्ये आलेली तेजी पाहता, कंपनीने नुकतेच आपल्या शेअर धारकांना 6:1 या रेशोमध्ये बोनस शेअर दिला आहे. ज्यांची एक्सपायरी डेट 4 जानेवारी 2023 होती.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Investmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारbusinessव्यवसाय