Share market Multibagger stock insolation energy ltd 3 lakh made 1 crore know about the company
शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी? By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 6:42 PM1 / 10शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. काही शेअर्सनी तर गुंतवणूकदारांना कोट्यधीशही बनवले आहे. सध्या अशाच एका शेअरची बाजारात धूम सुरू आहे. 2 / 10सोलर कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ दोन वर्षांतच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत 3650 रुपये एढी आहे.3 / 10गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना या कालावधीत 158 टक्के एवढा परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 1412.30 रुपये होती.4 / 10जर आपण 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तिचे मुल्य आज 2.58 लाख रुपये झाले असते. अर्थात आपल्याला 1.58 लाख रुपयांचा फायदा झाला असता. 5 / 10या वर्षात 300 टक्क्यांहून अधिकचा परतावा - या वर्षातही या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या 8 महिन्यांत या शेअरने 360 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 1 जानेवारीला या शेअरची किंमत 792.95 रुपये होती.6 / 10जर आपण 1 जानेवारी 2024 रोजी आपण या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आपल्याल 3.60 लाख रुपयांचा फायदा झाला असता आणि आपली रक्कम वाढून 4.60 लाख रुपयांवर पोहोचली असती. 7 / 1022 महिन्यांत केलं कोट्यधीश - गेल्या 22 महिन्यांचा विचार करता, या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. हा शेअर ऑक्टोबर 2022 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. तेव्हा याची किंमत 97 रुपये एवढी होती. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच साधारणपणे 22 महिन्यांत या शेअरने तब्बल 3663 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. 8 / 10जर आपण ऑक्टोबर 2022 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ही रक्कम वाढून 37.63 लाख रुपये झाली असती. तसेच, आपण त्याच वेळी या शेअरमध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आपली एकूण रक्कम 1.16 कोटी रुपये झाली असती.9 / 10काय करते कंपनी? - इंसोलेशन एनर्जी लिमिटेड सोलर एनर्जीशी संबंधित उद्योग करते. ही कंपनी सोलर पॅनल आणि मॉड्यूल तयार करते. जयपूरमध्ये कंपनीचे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटही आहे. कंपनीचे हे युनिट 60 हजार स्क्वेअर फुटहून अधिक परिसरात पसरलेले आहे. याशिवाय कंपनी सोलर PCU मध्येही व्यवसाय करते.10 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications