शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market Multibagger Stock: याला म्हणतात रिटर्न! २ दिवसांत ४३ हजारांचा फायदा; २१₹च्या शेअरमुळे १ लाखाचे झाले २.६० कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:14 PM

1 / 9
Share Market Multibagger Stock: शेअर बाजारात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. असे असले तरी असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्यासाठी योग्य स्टॉकमध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. योग्य समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास, काही दिवसांत तुम्हाला बंपर नफा मिळू शकतो.
2 / 9
एकीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू असताना, एका कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहेत. या कंपनीने दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ४३ हजार रुपयांचा नफा दिला आहे. या कंपनीच्या शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे.
3 / 9
गुंवतणूकदारांना या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे. आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेता कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते.
4 / 9
बाजारात घसरण होत असली तरी नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने अप्पर सर्किट दिसून आले. त्यामुळे नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या शेअरची किंमत ५,५३७.९५ रुपये झाली आहे.
5 / 9
नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरमध्ये अजूनही तेजी कायम आहे. नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. या शेअरमध्ये दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ४३ हजारांहून अधिक नफा झाला आहे.
6 / 9
गेल्या आठवड्यात या कंपनीच्या एका शेअरची किंमत ३,९७५ रुपये होती. आता या कंपनीचा शेअर ५,५३७.९५ रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीचे २५ शेअर्स ३,९७५ रुपयांना घेतले असते, तर गुंतवणूकदारांना दोन दिवसांत ४३ हजारांपेक्षा अधिकचा नफा झाला असता, असे सांगितले जात आहे.
7 / 9
या कंपनीचे बाजार मूल्य ११,४२१ कोटी आहे. ही एक मध्यम आकाराची कंपनी आहे, जी ग्राहक विवेकाधीन वस्तू आणि सेवा (CDGS) उद्योगात कार्यरत आहे. कंपनी सध्या रिअल इस्टेट विकास उद्योगात कार्यरत आहे.
8 / 9
गेल्या आठवड्यात नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) चे शेअर्स ४,७५८ रुपयांवर बंद झाले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचा अप्पर सर्किट लागून, शेअर ५,५३७.९५ रुपयांवर पोहोचला.
9 / 9
२३ जानेवारी २०१८ रोजी शेअरची किंमत २१.९० रुपये होती. एखाद्या व्यक्तीने तेव्हा कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत २.६० कोटी रुपये झाली असती. (टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक