शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या 4 सरकारी शेअर्सनं दिला बम्पर परतावा, एका वर्षात पाच पट वाढला पैसा; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 9:42 PM

1 / 6
मल्‍टीबॅगर स्टॉक्सच्या यादीत अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. यातील काही सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच 4 सरकारी स्‍टॉक्‍ससंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यांनी केवळ एका वर्षातच आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केले आहे.
2 / 6
मझगाव डॉक शिपबिल्‍डर्स (mazagon dock shipbuilders) - या सरकारी कपंनीच्या शेअरने गेल्या एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. मझगाव डॉक शिपबिल्‍डर्सच्या शेअरची किंमत 29 जून 2022 रोजी 255 रुपये होती. हा शेअर मंगळवारी 1,241 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे या शेअरने एका वर्षात 386 टक्के एवढा परतावा दिला आहे.
3 / 6
फर्टिलायझर्स अँड केमिकल्‍स त्रावणकोर (Fertilisers and Chemicals Travancore Ltd) - या शेअरनेही गेल्या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 382 टक्क्यांचा परतावा दिला. एक वर्षापूर्वी एनएसईवर हा शेअर 97.15 रुपयांवर होता. तो आता 468 रुपयांवर पोहोचला आहे.
4 / 6
रेल विकास निगम (Rail Vikas Nigam) - गेल्या एक वर्षापूर्वी हा शेअर 30.40 रुपयांवर होता. तो मंगळवारी 27 जूनला 123.90 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षात या शेअरने 307 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या शेअरने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 80.74 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
5 / 6
हिंदुस्‍तान एयरोनॉटिक्‍स (Hindustan Aeronautics) - या शेअरनेही एका वर्षात चांगली उसळी घेतली आहे. एक वर्षापूर्वी 1800 रुपयांना मिळणाऱ्या या शेअरची किंमत आता 3,670 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. एका वर्षात या डिफेन्स क्षेत्रातील शेअरने 103.87 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
6 / 6
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार