शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात शेअर! केवळ तीन वर्षांत ₹13 वरून ₹1300 वर पोहोचला, दिला 10000% चा छप्परफाड परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 6:20 PM

1 / 9
सोलार इंडस्ट्रीशी संबंधित कंपनी वारी रिन्यूएबलच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 3 वर्षांत छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षांत 13 रुपयांवरून थेट 1300 रुपयांवर पोहोचला आहे.
2 / 9
वारी रिन्यूएबलच्या (Waaree Renewable) शेअरने या कालावधीत 10000 टक्क्याहून अधिकचा परतावा दिला आहे. या छोट्या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1509.45 रुपये आहे. तर नीचांक 445 रुपये एवढा आहे.
3 / 9
शेअर्समध्ये 10000% हून अधिकची तेजी - वारी रिन्यूएबलचा शेअर 20 नोव्हेंबर 2020 रोजी 12.50 रुपयांवर होता. तो 24 नोव्हेंबर 2023 रोजी 1358.90 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या 3 वर्षांत 10780 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
4 / 9
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी वारी रिन्यूएबलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मुल्य 1.08 कोटी रुपये झाले असते.
5 / 9
11 महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 203% ची उसळी - वारी रिन्यूएबलच्या शेअर्समध्ये गेल्या 11 महिन्यांत 203 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 23 डिसेंबर 2022 रोजी 450.05 रुपयांवर होता. तो 24 नोव्हेंबर 2023 रोजी 1358.90 रुपयांवर पोहोचला.
6 / 9
जर 1 वर्षासंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअरने जवळपास 173 टक्क्यांची उसळी घेतली आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांत वारी रिन्यूएबलचा शेयर 55 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षात आतापर्यंत पॉवर जनरेशनल कंपनीच्या शेअरने जवळपास 171 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 74.48 टक्के आहे.
7 / 9
काय करते कंपनी - वारी रिन्यूएबल कंपनी सोलर इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी रूफटॉप सोलर प्रोजेक्ट्स, फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट्स आणि ग्राउंड माउंटेड सोलर प्रोजेक्ट्स इंस्टॉल करण्याचे काम करते. महत्वाचे म्हणजे, आपण संपूर्ण देशभरात 100000 हून अधिक रूफटॉप सोलर प्रोजेक्ट्स इंस्टॉल केले आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक