Share Market Navkar urbanstructure shares delivered more than 300 percent return in a year
जबरदस्त! 'या' कंपनीच्या शेअरनं फक्त वर्षभरात दिला 300% परतावा, आता 5:1 रेशोमध्ये स्प्लिट होणार स्टॉक By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:13 AM1 / 6शेअर बाजाराची सातत्याने घसरण होत असतानाच एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. Navkar (नवकार) अर्बनस्ट्रक्चर, असे या कंपनीचे नाव आहे. या रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात 300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 6या कंपनीचा शेअर एका वर्षातच 14.35 रुपयांवरून 62.35 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत सुमारे 43 टक्के एवढा परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकच्या संचालक मंडळाने 5:1 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट करण्याची शिफारस केली आहे.3 / 6स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट निश्चित - Navkar अर्बनस्ट्रक्चरच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट साठी 24 जून 2022 ही रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. कंपनी 5:1 च्या रेशोत स्टॉक स्प्लिट करत आहे. या मल्टीबॅगर रियल इस्टेट स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 रुपये एवढी आहे. जी स्टॉक स्प्लिटनंतर प्रती शेअर 2 रुपयांवर येईल. 4 / 6कंपनीचे मार्केट कॅप सध्या 136 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीने नुकताच आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्रत्येक शेअरवर 1 टक्का लाभांश अनाउंस केला आहे.5 / 6कंपनीच्या शेअरने आतापर्यंत दिला जवळपास 1200 टक्के एवढा परतावा - Navkar अर्बनस्ट्रक्चरच्या शेअरने सुरुवातीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना तब्बल 1,198 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 3 जानेवारी 2007 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4.80 रुपयांवर होता. 16 जून 2022 रोजी तो BSE वर 62.35 रुपयांवर बंद झाला.6 / 6जर एखाद्या व्यक्तीने 3 जानेवारी 2007 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 13 लाख रुपयांच्या जवळपास झाले असते. आणखी वाचा Subscribe to Notifications