शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market: शेअर बाजारात 'Salman' आणि 'Hrithik' चा डंका; गुंतवणूकदारांना दिले 37% रिटर्न्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 4:57 PM

1 / 6
Share Market: बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) मंगळवारी 27 डिसेंबर 2022 रोजी 57 वर्षांचा झाला. बॉलिवूडमध्ये सलमानच्या नावाचा दबदबा आहेच, पण भारतीय शेअर बाजारातही (Share Market) 'सलमान'चाच डंका वाजत आहे. या नावात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 2022 मध्ये 37 टक्क्यापर्यंतचा रिटर्न मिळाला आहे. तुम्ही विचार करत असाल की, Salman चा स्टॉक मार्केटशी नेमका काय संबंध आहे..?
2 / 6
पॅकमध्ये या कंपन्यांचे नाव सामील- शेअर बाजारात काही कंपन्या आहेत, ज्याचा सलमान खानशी नाही तर सलमान नावाशी संबंध आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपन्यांमध्ये भारतीय स्टेट बँक (SBI), अॅक्सिस बँक (Axis Bank), लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro), मारुती सुझुकी (Maruti Suzuki), अदानी पोर्ट्स (Adani Ports) आणि एनटीपीसी (NTPC) सरख्या सहा लार्जकॅप शेअर्सचा समावेश आहे.
3 / 6
अशाप्रकारे Salman नाव झाले- या सर्व कंपन्यांचे पहिले अक्षर जोडले, तर SALMAN नाव तयार होते. यामुळेच शेअर बाजारात वर्षभर या नावाचीच चर्चा होती, असे आम्ही म्हणत आहोत. या सहा कंपन्यांनी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के+ परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांनी जास्तीत जास्त 37, तर कमीत कमी 10 टक्के परतावा दिलाच आहे. म्हणजेच, या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना निराश केले नाही.
4 / 6
सलमानच्या या शेअर्समध्ये तेजी- Salman मध्ये सामील Axis Bank च्या गुंतवणूकदारांनाही चांगला लाभ झाला आहे. बँकेचे शेअर्स 31 डिसेंबर 2021 पर्यंत 678.55 रुपयांवर होते, जे 37 टक्क्यांनी वाढून 933 रुपयांवर आले. याशिवाय डिसेंबर 2021 च्या अखेर 124.40 रुपयांवर असलेला NTPC चा शेअर 33 टक्के वाढून 165.55 रुपयांवर पोहोचला. SBI ने कॅलेंडर इअरमध्ये आतापर्यंत 30 टक्के वाढ नोंदवली असून, शेअर 460.45 रुपयांवरुन 596.75 रुपयांवर गेला आहे.
5 / 6
2023साठी टॉप पिक्स शेअर्समध्ये सामील- या कॅलेंडर इअरमध्ये सलमान पॅकमध्ये सामील Maruti Suzuki, Adani Ports आणि Larsen & Toubro कंपनीच्या शेअर्सनीदेखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 10 ते 11 टक्के तेजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, मोतीलाल ओसवाल सिक्योरिटीजच्या 2023 च्या टॉप पिक्स शेअर्समध्ये सलमानच्या एसबीआय, एल अँड टी, मारुती सुझुकी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स सामील आहेत.
6 / 6
मार्केटमध्ये Hrithik चाही जलवा- शेअर बाजारात सलमान (Salman) सोबतच ऋतिक (Hrithik) चाही दबदबा पाहायला मिळाला आहे. ऋतिक पॅकमध्ये सामील शेअर्सबाबत बोलायचे झाल्यावर यात एचडीएफसी ट्विन्स (HDFC twins), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेज (TCS), इंफोसिस (Infosys) आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सामील आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारSalman Khanसलमान खानHrithik Roshanहृतिक रोशन