share market nse clearing alert for fake communication to investor
शेअर बाजारात गुंतवणूक करताय? मग या मेसेजसपासून सावध राहा; NSE कडून अलर्ट जारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:25 PM1 / 5जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमची फसवणूक टाळू शकते. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजची (NSE) शाखा NSE Clearing Limited ने गुंतवणूकदारांना अलर्ट जारी केला आहे.2 / 5NSE क्लिअरिंगने एका परिपत्रकात म्हटले आहे की, बनावट लोगो आणि लेटरपेड वापरुन अनाधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या कथितपणे जप्त केलेल्या डिमॅट खात्यांचे पैसे भरण्यास सांगितले आहे.3 / 5गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी NSE क्लिअरिंगने गुंतवणूकदारांना कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा मेल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.4 / 5क्लिअरिंग कॉर्पोरेशन शेअर्स किंवा सिक्युरिटीजचे पेमेंट ब्रोकरच्या खात्यात जमा करते. त्यानंतर ते संबंधित ग्राहकांच्या डिमॅट खात्यात जमा केले जाते. एक्सचेंज लिमिटेड आणि मार्केट रेग्युलेटर सेबी यांनी मिळून गुंतवणूकदारांच्या हितासाठी नवीन नियम बनवले आहेत.5 / 5याआधी सेबीने ग्राहकांच्या खात्यात शेअर्सचे थेट पेमेंट करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. ऑपरेशन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सिक्युरिटीजबाबत ग्राहकांची जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. सेबीचा हा नियम १४ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications