Share market Poonawal's share rose 2700 Percent in only 3 years rs1 lakh became rs28 lakhs
पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 4:12 PM1 / 7नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) असलेल्या पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 13 रुपयांवरून 380 रुपयांवर पोहोचला आहे. 2 / 7पूनावाला फिनकॉर्पच्या (Poonawalla Fincorp) शेअर्समध्ये या कालावधीत 2700 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. कंपनीच्या शेअरर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 385 रुपये एवढा आहे. तर निचांक 243.75 रुपये एवढा आहे.3 / 71 लाख रुपयांचे केले 28 लाख रुपये - पूनावाला फिनकॉर्पचा शेअर 29 मे 2020 रोजी 13.35 रुपयांवर होता. तो 28 जुलै 2023 रोजी बीएसईवर 380.35 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीच्या शेअरने 2749 टक्क्यांचा परतावाद दिला आहे. 4 / 7जर एखाद्या व्यक्तीने 29 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याच्या शेअर्सची एकून व्हॅल्यू 28.49 लाख रुपये झाली असती.5 / 7एका वर्षात 43% टक्के परतावा - पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 43 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 28 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 268.30 रुपयांवर होता. तो 28 जुलै 2023 रोजी 380.35 रुपयांवर पोहोचला. 6 / 7गेल्या 6 महिन्यांपूर्वी पूनावाला फिनकॉर्पचा शेअर 32 टक्यांनी वधारला आहे. यावर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर 26 टक्क्यांनी वधारले आहेत. पूनावाला फिनकॉर्पचे मार्केट कॅप 29,265 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications