शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala : टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांची बम्पर कमाई, फक्त 11 दिवसांत कमावले 1,088 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 6:24 PM

1 / 9
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये शुक्रवारी बहुतांश शेअर्समध्ये वाढ दिसून आली. टाटा ग्रूपचा टायटन स्टॉकही (Titan stock) त्यांपैकीच एक आहे.
2 / 9
टायटनचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 2.84 टक्क्यांनी वाढून 2,188.90 रुपयांवर बंद झाला. गेल्या सात ट्रेडिंग दिवसांमध्ये हा शेअर सुमारे 8.72 टक्यांनी वाढला आहे. या कालावधीत हा शेअर 175.5 रुपयांनी वाढला आहे.
3 / 9
गेल्या 6 जुलैला टायटनचा शेअर 2013.40 रुपयांवर होता. यापासून शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी 784 कोटी रुपयांचा जबरदस्त नफा मिळवला आहे. तसेच, या महिन्यात आतापर्यंत बिग बुलनेने या स्टॉकमधून सुमारे 1,088 कोटी रुपये कमावले आहेत.
4 / 9
कंपनीच्या शेअरची स्थिती - जुलै महिन्याचा विचार करता, या महिन्यात आतापर्यंतच्या 11 ट्रेडिंग सेशंसमध्ये टायटनचा शेअर 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात, त्यात 242.8 रुपयांची, म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे.
5 / 9
टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्क्यांनी वाढला. तर, या वर्षी YTD मध्ये हा शेअर 13.27 टक्यांनी खालच्या पातळीवर ट्रेड होत आहे. BSE वर टायटनचा जास्तीत जास्त परतावा 31,170.00 टक्के एवढा आहे.
6 / 9
टायटन कंपनीत राकेश झुनझुनवालांचा वाटा - टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा टाटाच्या या कंपनीत मोठा वाटा आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,53,10,395 एवढे शेअर्स अथवा 3.98 टक्के वाटा आहे. तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 95,40,575 शेअर्स अथवा 1.07 टक्के शेअर्स आहेत. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत.
7 / 9
झुनझुनवालांची संपत्ती वाढली - राकेश झुनझुनवालांकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 एवढे शेअर्स आहेत. टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गेल्या सात व्यापारी दिवसांमध्ये प्रति शेअर 175.5 रुपयांची वाढ झाली आहे. या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर बिग बुलच्या मालमत्तेत अंदाजे (175.5 x 4,48,50,970) 786 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच झुंझुवाला यांनी जुलै महिन्यात आतापर्यंत या स्टॉकमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
8 / 9
टायटनमध्ये सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत झुंझुनवाला - ताज्या शेअर पॅटर्ननुसार, पब्लिक शेअर होल्डर्समध्ये, राकेश झुंझुनवाला यांचा टायटनमधील हिस्सा सर्वाधिक आहे. टायटनमध्ये एकट्या झुंझुंवाला यांचा वाटा 3.98 टक्के एवढा आहे.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाTataटाटाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार