Share Market Rakesh Jhunjhunwala portfolio nazara technologies share jump 16 percent today
रॉकेट बनलाय राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 3:33 PM1 / 9राकेश झुनझुनवाला सपोर्टेड ऑनलाइन गेमिंग स्टॉक नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरच्या किमतीत (Nazara Technologies Share Price) आज जबरदस्त वाढ दिसत आहे. हा शेअर आज सोमवारी NSE वर 16.12 टक्क्यांनी वाढून 615.55 रुपयांवर पोहोचला आहे.2 / 9बीएसईवर हा शेअर 16.52 टक्क्यांची उसळी घेत 617.75 रुपये प्रती शेअरवर ट्रेड करत आहे. हा शेअर एनएसईवर जुलै 2022 मध्ये 52 आठवड्यातील लो लेव्हलवर म्हणजेच, 475.05 रुपयांवर गेला होता. लेटेस्ट प्राइसचा विचार करता हा शेअर 52 आठवड्यांच्या लो लेव्हल पेक्षा 30.04 टक्क्यांनी वर आहे.3 / 9असे आहे तेजीचे कारण - कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे तिमाहीतील परिणाम आहेत. खरे तर, गेल्या आठवड्यात शुक्रवारी, कंपनीने Q1 निकाल जाहीर केला. यानंतर, आज व्यापाराच्या सुरुवातीलाच नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत 625.50 वर पोहोचली होती. शुक्रवारी हा शेअर 530.10 रुपयांवर वर बंद झाला होता.4 / 9काय म्हणतात बाजारातील तज्ज्ञ? शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कंपनीने एप्रिल ते जून 2022 या तिमाही दरम्यान नोंदवलेली वाढ कंपनीच्या विलीनीकरण आणि अधिग्रहणामुळे आहे. तज्ज्ञांच्या मते, राकेश झुनझुनवाला समर्थित ही ऑनलाइन गेमिंग कंपनी अजूनही तिच्या ऑरगॅनिक नंबर्सपासून मागे आहे.5 / 9जूनच्या तिमाहीत Nazara Technologies च्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक 22 टक्के वाढ झाली आहे. Q1FY22 मध्ये Nazara Technologies चा प्रॉफिट 16.50 रुपये कोटी झाला. याच काळात कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये जवळपास 70 टक्के एवढी वाढ झाली आहे.6 / 9टारगेट प्राइस किती? - चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया म्हणाले, 'या ऑनलाइन गेमिंग स्टॉकने जबरदस्त उसळी घेतली आहे. तसेच या शेअरचे मजबूत समर्थन क्षेत्र 525 रुपये ते 550 रुपयांवर आहे. हा शेअर 650 ते 670 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.'7 / 9राकेश झुनझुनवालांकडे 65 लाख शेअर्स - एप्रिल ते जून 2022 तिमाहीसाठी नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, बिग बुल राकेश झुनझुनवालांकडे कंपनीचे 65,88,620 शेअर्स आहेत. अर्थात 10.03 टक्के वाटा आहे.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9राकेश झुनझुनवाला... आणखी वाचा Subscribe to Notifications