Share market sajjan jindal company jsw energy delivered 1600 percent return in 4 year
धमाका...! JSW ग्रुपच्या शेअरनं ४ महिन्यांत दिला १६००% चा बंपर परतावा; ₹४० चा स्टॉक ₹७०० पार पोहोचला By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 2:48 PM1 / 7सज्जन जिंदल यांच्या मालकीच्या जिंदल समूहाची कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या चार महिन्यात जबरदस्त तेजी आली आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीचा (JSW Energy) शेअर गेल्या केवळ ४ वर्षांत ४० रुपयांवरून थेट ७०० रुपयांवर पोहोचला आहे.2 / 7या शेअरमध्ये गेल्या केवळ ४ वर्षांत १६०० पर्सेंटहून अधिकची तेजी आली आहे. हा शेअर बुधवारी ७१३.१५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २५१.७५ रुपये एवढा आहे.3 / 71 लाखाचे केले 17 लाख - JSW एनर्जीच्या शेअरने गेल्या 4 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. 29 मे 2020 रोजी JSW एनर्जीचा शेअर 40 रुपयांवर होते. तो 19 जून 2024 रोजी 713.15 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरने 4 वर्षांत गुंतवणूकदारांना 1600% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.4 / 7जर एखाद्या व्यक्तीने २९ मे २०२० रोजी JSW एनर्जीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे मूल्य १७.८२ लाख रुपये झाले असते.5 / 7एकावर्षात 175% हून अधिकची तेजी - गेल्या एका वर्षात JSW एनर्जीच्या शेअर्समध्ये 175% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 19 जून 2023 रोजी कंपनीचा शेअर 253.50 रुपयांवर होता. तो 19 जून 2024 रोजी 713.15 रुपयांवर पोहोचला आहे.6 / 7या वर्षात आतापर्यंत JSW एनर्जीच्या शेअरने 73% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 63% पेक्षाही अधिकची वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांचा विचार करता या शेअरने 47% हून अधिकचा परतावा दिला आहे.7 / 7(टीप येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications