शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹1 च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एकाच वर्षात 1 लाखाचे झाले ₹2 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 4:37 PM

1 / 8
शेअर बाजारातील एका शेअरने आपल्या गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला आहे. या शेअर आहे श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा सातत्याने लागणाऱ्या 2% च्या अप्पर सर्किटसह हा शेअर 222.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
2 / 8
गेल्या केवळ सहा महिन्यांतच या शेअरने तब्बल 9,000% पर्यंतचा परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 2.50 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे.
3 / 8
वर्षभरात 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा - श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा ​​शेअर सातत्याने जबरदस्त परतावा देत आहेत. हा शेअर गेल्या पाच दिवसांत 9% तर एका महिन्यात 50% ने वधारला आहे. या वर्षात YTD मध्ये हा शेअर आतापर्यंत 7,472.41% ने वधारला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 2.90 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे.
4 / 8
या शेअरने एका वर्षात तब्बल 15,044.83% एवढा परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 1.45 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. याचाच अर्थ या शेअरने गेल्या एका वर्षात एक लाख रुपयांचे तब्बल 2 कोटी रुपये केले आहेत.
5 / 8
या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 222.50 रुपये तर नीचांक 1.26 रुपये एवढा आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 564.55 कोटी रुपये आहे.
6 / 8
काय करते कंपनी? - श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्क लिमिटेड एक मीडिया कंपनी असून हिची स्थापना 1994 मध्ये झाली. ही कंपनी विविध ब्रॉडकास्टर, अॅग्रीगेटर्स आणि सॅटेलाइट नेटवर्कसाठी कंटेंट प्रोडक्शन आणि कंटेंट सिंडिकेशन क्षेत्रात कार्यरत आहे.
7 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा