शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाटाच्या शेअर्सची कमाल, पैसा लावणाऱ्यांची धमाल! 1 लाखाचे झाले 73 लाख; मिळाला 7000% हून अधिक परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 8:11 PM

1 / 8
बाटा इंडियाच्या शेअर्सनी (BATA India stocks) गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना 7000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
2 / 8
महत्वाचे म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांनी काही वर्षांपूर्वी बाटा इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, आज त्याचे 73 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,261.65 रुपये आहे. बाटा इंडियाचे मार्केट कॅप 24,715 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
3 / 8
गुंतवणूकदारांना मिळाला 7,250 टक्यांचा परतावा - बाटा इंडियाचा शेअर 21 मे 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंवर (BSE) 25.95 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 28 मार्च 2022 रोजी बीएसईवर 1,928.75 रुपयांवर आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 18 वर्षांत गुंतवणूकदारांना 7,250 टक्यांचा परतावा दिला आहे.
4 / 8
1 लाख रुपयांचे झाले 73 लाख रुपये - जर एखाद्या व्यक्तीने 21 मे 2004 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि अपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर, आज त्या एक लाखाचे 73.69 लाख रुपये झाले असते.
5 / 8
5 वर्षांत जवळपास 4 पट वाढला लावलेला पैसा - बाटा इंडियाचा शेअर 3 मार्च 2017 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 497.85 रुपयांवर होता. 28 मार्च 2022 रोजी कंपनीचा शेअर BSE वर 1,928.75 रुपयांवर व्यापार करत आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समधील पैसा 5 वर्षांत जवळपास 4 पट झाला आहे.
6 / 8
जर एखाद्या व्यक्तीने 3 मार्च 2017 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर ही रक्कम आता 3.87 लाख रुपये एवढी झाली असती.
7 / 8
तर 1 लाख रुपयांचे झाले असते, 1.58 कोटी रुपये - बाटा इंडियाचा शेअर 2 मे 2003 रोजी बीएसईवर 12.14 रुपये एवढा होता. हा शेअर 28 मार्च 2022 रोजी BSE वर 1,928.75 रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने 2 मे 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता याचे 1.58 कोटी रुपये झाले असते.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारMONEYपैसाInvestmentगुंतवणूक