Share market stock market Rajiv jain led GQG Partners made 3100 crore profit in just two days
फक्त दोनच दिवसांत 3,100 कोटींचा प्रॉफिट...! अदानी ग्रुपवर डाव लावून मालामाल झाले राजीव जैन! By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 8:02 PM1 / 8हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या अदानी समूहासाठी राजीव जैन तारणहार बणून आले आणि त्यांनी केवळ दोनच दिवसांत 3,100 कोटी रुपयांचा नफा कमावला. खरे तर त्यांच्या GQG Partners कंपनीने ब्लॉक डीलच्या माध्यमाने अदानी समूहाचे 15,446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ही बातमी येताच अदानी समूहाचे शेअर्स रॉकेट बनले आणि राजीव जैन यांना याचा छप्परफाड फायदा झाला.2 / 8आता अदानी समूहाच्या चार कंपन्यांतील जैन यांची गुंतवणूक 18,548 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अर्थात केवळ दोनच दिवसांत जीक्यूजी पार्टनर्सची गुंतवणूक व्हॅल्यू 3,102 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 3 / 8महत्वाचे म्हणजे, जेव्हा गुंतवणूकदार अदानी समूहाच्या कंपन्यांकडे पाठ फिरवत होते, त्याच वेळी जैन यांनी मोठी जोखीम पत्करली आणि याचा त्यांना जबरदस्त फायदा झाला.4 / 8तत्पूर्वी, अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म Hindenburg Research ने 24 जानेवारीला अदानी समूहासंदर्भात एक निगेटिव्ह रिपोर्ट जारी केला होता. यामुळे, जवळपास एक महिना अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. यानंतर, गुरुवारी जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केले होते. 5 / 8यात समूहाच्या, अदानी एंटरप्रायजेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनमिक झोन (Adani Ports and Special Economic Zone), अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) च्या शेअर्सचा समावेश होता. लॉन्ग टर्ममध्ये इन कंपन्यांमध्ये ग्रोथची मोठी शक्यता आहे, असे जीक्यूजी पार्टनर्सचे म्हणणे आहे.6 / 8किती रुपयांचा झाला फायदा - जैन यांनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर 1410.86 रुपयांना खरेदी केला होता. केवळ दोनच दिवसांत या शेअरच्या किंमतीत 33 टक्क्यांची तेजी आली आहे. या स्टॉकमधून जैन यांना तब्बल 1,813 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.7 / 8जीक्यूजी पार्टनर्सने अदानी पोर्ट्सचा शेअर 596.2 रुपये, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 504.6 रुपये आणि अदानी ट्रांसमिशनचा शेअर 668.4 रुपयांना खरेदी केला. हे शेअर शुक्रवारी 684.35 रुपये, 562.00 रुपये आणि 743.75 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात लिस्टेड GQG Partners च्या शेअर्समध्ये शुक्रवारी तीन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.8 / 8GQG Partners की स्थापना जून 2016 मध्ये राजीव जैन यांनी केली आहे. तेच या कंपनीचे चेअरमन आणि सीआईओ देखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications