शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATAच्या या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना करणार मालामाल? पहिल्याच दिवशी ₹900 वर पोहोचण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 2:30 PM

1 / 7
टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतो. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरचे प्रिमियम सातत्याने वाढताना दिसत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सचे ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आता 400 रुपयांच्याही वर पोहोचले आहे.
2 / 7
टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) शेअर लिस्टिंगच्या दिवशीच 900 रुपयांवर पोहोचू शकतो. असे संकेत या वाढत्या प्रिमियममुळे मिळत आहेत. महत्वाचे म्हणजे, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 24 नोव्हेंबर अर्थात आजपर्यंतच खुला आहे.
3 / 7
900 च्याही पार जाऊ शकते शेअर्सची लिस्टिंग - टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा प्राइस बँड 475-500 रुपये एवढा आहे. तसेच, इन्व्हेस्टरगेनच्या मते, कंपनीच्या शेयर्सचे ग्रे मार्केट प्रिमियम वाढून 403 रुपयांवर पोहोचले आहे.
4 / 7
जर कंपनीचा शेअर 500 रुपयांच्या अपर प्राइस बँडवर अॅलॉट झाला तर तो 903 रुपयांच्या जवळपास लिस्ट होऊ शकतो. अर्थात, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 80 टक्क्यांहून अधिकचा फायदा होऊ शकतो. कंपनीचा शेअर 5 डिसेंबरला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकतो.
5 / 7
2 दिवसांत 15 पट सब्सक्राइब झाला IPO - टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ (Tata Technologies IPO) सुरुवातीच्या दोन दिवसांतच 15.10 पट सब्सक्राइब झाला असून कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा कोटा 11.56 पट सब्सक्राइब झाला आहे. नॉन-इंस्टिट्यूशनल इनव्हेस्टर्सचा कोटा 31.19 पट सब्सक्राइब झाला आहे. तर क्वॉलीफाइड इंस्टिट्यूशनल बायर्स कोट्यात 8.55 पट गुंतवणूक करण्यात आली आहे.
6 / 7
कंपनीच्या आईपीओमध्ये एंप्लॉइज कॅटेगिरीला 2.47 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर अदर्स कॅटेगिरीमध्ये 20.48 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्स किमान 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉट्ससाठी खरेदी करू शकतात. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 30 शेअर आहेत.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक