शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर आहे की कुबेराचा 'खजिना'? 1 वर्षात दिला 2,200% परतावा! गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 5:13 PM

1 / 8
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 16 नोव्हेंबर 2022 रोजी 24.35 रुपयांवर होता. तो 16 नोव्हेंबर 2023 रोजी 608 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
2 / 8
एका वर्षाच्या होल्डिंग कालावधीतील ही अंदाजे 2,200% ची वाढ आहे. वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 23 लाख रुपयांवर पोहोचली आहे.
3 / 8
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेडने 30 सप्टेंबर, 2023 (H1FY24) रोजी संपलेल्या सहामाही निकालाची यादी दिली आहे. H1FY24 साठी कंपनीचा महसूल 26.11 कोटी रुपये होता. ही वार्षिक 246.38 टक्के एवढी वाढ आहे.
4 / 8
या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 9.71 कोटी रुपये एवढा होता. या शिवाय, कंपनीचा पीएटी 8.05 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच सहामाहीत 0.07 कोटी रुपये होता.
5 / 8
टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेड प्रामुख्याने रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशंस प्रदान करण्याच्या कामात लागली आहे. ही कंपनी स्टीम कुकिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांत वापरल्या जाणार्‍या स्टीम उत्पादनासाठी सोलर पॅराबॉलिक कॉन्सन्ट्रेटिंग सिस्टिम तयार करण्यात निपून आहे.
6 / 8
आज कंपनीचा शेअर 608.25 रुपयांवर खुला झाला. तो 608.25 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर आणि 591.05 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
7 / 8
हा शेअर सध्या 5% च्या वाढीसह 608.25 रुपयांवर व्यवहार करत आहे. याचा 52- आठवड्यांतील उच्चांक 719.00 रुपये तर नीचांक 23.15 रुपये एवढा आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा