शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 5 पेनी स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड; फक्त 22 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल, दिला छप्परफाड परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 4:19 PM

1 / 8
जर आपण पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आपल्यासाठी एक कामाची बातमी घेऊन आलो आहोत. आज आम्ही आपल्याला अशाच 5 पेनी स्टॉक्स संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केवळ महिनाभरातच मालामाल केले आहे.
2 / 8
या शेअर्सची किंमत अत्यंत कमी आहे. मात्र, परतावा जबरदस्त आहे. केवळ महिनाभरातच या शेअर्सनी जवळपास 180 टक्के एवढा छप्परफआड परतावा दिला आहे. तर जाणून घेऊयात या शेअर्स संदर्भात...
3 / 8
Raj Rayon - राज रेयॉनचा शेअर आज (बुधवार) 4.74 टक्क्यांनी वाढून 3.76 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर 16 मार्च 2022 रोजी बीएसईवर 1.35 रुपयांवर होता. आजच्या किमतीचा विचार करता, या शेअरने महिनाभरात तब्बल 179 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2.78 लाख रुपये झाले असते.
4 / 8
Hemang Resources - हेमंग रिसोर्सेसचा शेअर आज 4.91टक्यांच्या तेजीसह 40.60 रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यापूर्वी 14 मार्चला बीएसईवर या शेअरची किंमत 14.71 रुपये होती. अर्थात या शेअरने एका महिन्यात 176 टक्के एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याच्या सुरुवातीला या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 2.76 लाख रुपये झाले असते.
5 / 8
Kaiser Corporation - गेल्या 14 मार्चला कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरची किंमत 29.15 रुपये होती. आज बीएसईवर यात जवळपास 5 टक्यांची वाढ झाली. आता हा शेअर 80.35 रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान या शेअरने गुंतवणुकदारांना 175.64 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज 2.75 लाख रुपये झाले असते.
6 / 8
Gallops Enterprise Ltd - गेल्या महिनाभरापूर्वी बीएसईवर Gallops Enterprise च्या शेअरची किंमत 9.82 रुपये होती. ती वाढून आता 27 रुपये झाली आहे. या शेअरमध्ये आज 4.85 टक्क्यांची तेजी दिसून आली. या शेअरनेही गेल्या महिनाभरात 174.95 टक्के एवढा तगडा परतावा दिला आहे. जर एक महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज 2.74 लाख रुपये झाले असते.
7 / 8
Elegant Flori - एक महिन्यापूर्वी बीएसईवर एलेजंट फ्लोरीच्या शेअरची किंमत 25.75 रुपये होती. आज या शेअरची किंमत 50.15 रुपये आहे. या काळात या शेअरने 104.28 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे आज 1.94 लाख रुपये झाले असते.
8 / 8
टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार