शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांना 'कंगाल' करतोय हा शेअर; सातत्याने घसरतोय भाव; LIC ची मोठी हिस्सेदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 6:22 PM

1 / 8
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूह कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे ​​शेअर्स सोमवारी 5% च्या लोअर सर्किटवर पोहोचले. कंपनीचा शेअर 4.24 रुपयांवर आला. यापूर्वी शुक्रवारीही हा शेअर ट्रेडिंग दरम्यान 5% ने घसरला होता. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठे कारण आहे.
2 / 8
खरेतर, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून बाजार नियामक सेबीने उद्योगपती आणि इतर 24 जणांवर पाच वर्षांसाठी रोखे बाजारात बंदी घातल्यानंतर शेअरमध्ये घसरण सुरू आहे.
3 / 8
सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 जणांवर कंपनीच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी रोखे बाजारात बंदी घातली आहे.
4 / 8
सेबीने अंबानी यांना 25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच बरोबर त्यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किंवा बाजार नियामकाकडे नोंदणीकृत कोणत्याही संस्थेमध्ये संचालकपद किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पद (KMP) धारण करण्यावरही पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
5 / 8
याशिवाय, 24 युनिट्सवर 21 कोटी रुपयांपासून ते 25 कोटी रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला आहे. तसेच, नियामकाने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे आणि त्यावर 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
6 / 8
एलआयसीकडे 74 लाख शेअर्स - शेयरहोल्डिंग पॅटर्न नुसार, रिलायन्स होम फायनान्समध्ये प्रमोटर अनिल अंबानी फॅमिलीचा वाटा 0.74 टक्के आहे. तर पब्लिक शेयरहोल्डिंग 99.26 टक्के आहे. यात एलआयसीकडे 74,86,599 शेअर्स आहेत. ही जवळपास 1.54 टक्के हिस्सेदारीच्या जवळपास आहे.
7 / 8
अशी आहे शेअरची स्थिती - रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरने जानेवारी महिन्यात 6.22 रुपयांच्या पातळीला स्पर्ष केला होता. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांकही होता. ऑगस्ट 2023 मध्ये शेअरची किंमत 1.61 रुपये होती, हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक होता. 2017 मध्ये या शेअरची किंमत 120 रुपयांपेक्षाही अधिक होती.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजार