शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:20 PM

1 / 8
शेअर बाजारात स्मॉलकॅप कंपनी वेसुव्हियस इंडियाच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी 15 टक्क्यांहून अधिकने वधारून 5062.10 रुपयांवर पोहोचला आहे.
2 / 8
वेसुव्हियस इंडियाचा शेअर आपल्या ऑल-टाइम हायवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये ही तेजी मार्च 2024 तिमाहीच्या निकालानंतर आली आहे. हा शेअर एक वर्षात तीन पट वाढला आहे. कंपनीच्या शेअचा 52 आठवड्यांचा निचांक 1613.05 रुपये आहे.
3 / 8
1 वर्षात 1600 रुपयांवरून 5000 रुपयांवर पोहोचला शेअर - वेसुव्हियस इंडियाच्या (Vesuvius India) शेअरमध्ये गेल्या एका वर्षात जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 2 मे 2023 रोजी 1642.60 रुपयांवर होता. तो 30 एप्रिल 2024 रोजी 5062.10 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 2 वर्षात 400 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.
4 / 8
वेसुव्हियस इंडिया सेरेमिक सिस्टमचे मॅन्युफॅक्चरिंग करते. जे कॉस्टिंग प्रोसेसमध्ये लिक्विड स्टीलला कंट्रोल, प्रोटेक्ट आणि मॉनिटर करते. याशिवाय, कंपनी आयरन अँड स्टील प्रॉडक्शनसाठी रिफ्रॅक्टरी लायनिंग मटेरियल्सचे प्रॉडक्शन करते.
5 / 8
1000 करोड़ रुपये का इनवेस्ट करेगी कंपनी वेसुव्हियस इंडिया पुढील काही वर्षांत भारतात सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने नुकतेच विशाखापट्टणममध्ये नवीन मोल्ड फ्लक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले आहे. कंपनीला मार्च 2024 च्या तिमाहीत 68.8 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
6 / 8
एक वर्षापूर्वीच्या समाल कालावधीच्या तुलनेत कंपनीचा नफा 59 टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या महसुलात 24 टक्क्यांची वाढ होऊन तो 453 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एकवर्षापूर्वीच्या समान कालावधीत 366 कोटी रुपये होता.
7 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार