शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ हजारांपार जाऊ शकतो Titan चा शेअर, झुनझुनवाला कुटुंबीयांकडे आहेत ३ कोटी शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:16 AM

1 / 7
Titan Share Price : टायटन कंपनीचा (Titan Company) स्टॉक हा दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा आवडता स्टॉक होता. म्युच्युअल फंड, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी टायटन शेअर्स हा ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बनला आहे.
2 / 7
टाटा समूहाच्या या समभागाने अलीकडेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 2791 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. तथापि, विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, टायटनच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आणि लाँग टर्म पोझिशनल गुंतवणूकदारांचाही कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूकीत रस वाढला आहे.
3 / 7
शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टाटा समूहाचा हा शेअर घरसल्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूकदारांची पसंत ठरू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सुरू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत कंपनीचे चांगले परिणाम दिसून येतील अशी बाजाराची अपेक्षा आहे.
4 / 7
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीचे शेअर्स सध्याच्या पातळीवर खरेदी केले जाऊ शकतात आणि टायटनचे शेअर्स 2350 रुपयांच्या वर असेपर्यंत टायटनचे शेअर्स अॅक्युमुलेट केले जाऊ शकतात. टायटनचे शेअर्स मिड टर्ममध्ये 3000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्याच वेळी, टायटनचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी 5000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
5 / 7
दीर्घकालीन गुंतवणूकदार 6 ते 9 महिन्यांत 3000 रुपयांच्या टार्गेटसाठी आणि 2 वर्षांत 5000 रुपयांच्या टार्गेटसाठी टायटनचे शेअर्स खरेदी करू शकतात. टायटनचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत जवळपास 25 टक्क्यांनी वाढले आहेत. 16 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2110.75 रुपयांच्या पातळीवर होते. 14 नोव्हेंबर रोजी टायटनचे शेअर्स 2630.70 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
6 / 7
जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचाही टाटा समुहाच्या या कंपनीत हिस्सा आहे.
7 / 7
राकेश झुनझुनवाला यांचा टायटनमध्ये 3,41,77,395 शेअर्स किंवा 3.85 टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 1,50,23,575 शेअर्स किंवा 1.69 टक्के आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झालं.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजार