शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹५० चा शेअर सुस्साट सुटला! एका बातमीनं चक्र फिरवलं अन् ९% ने भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 3:51 PM

1 / 8
एक बातमी शेअर बाजारावर खूप परिणाम करू शकते. याचाच प्रत्यय स्पाईसजेटच्या शेअर्सनं दिला आहे. खासगी क्षेत्रातील एअरलाइन स्पाईसजेटच्या शेअर्सने गुरूवारी गुंतवणूकदारांना खुशखबर दिली.
2 / 8
आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी स्पाईसजेटचा शेअर ५५ रूपयांवर पोहोचला. बुधवारी ५०.३७ रूपयांवर शेअर बंद झाला होता. एकूणच मागील एका दिवसाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढ झाली.
3 / 8
५ फेब्रुवारीला हा शेअर ७७.५० रूपयांवर होता. हा शेअरचा मागील ५२ आठवड्यातील उच्चांक ठरला. एका वृत्ताने स्पाईसजेटच्या शेअरचा भाव वाढला आहे.
4 / 8
खरं तर स्पाईसजेटने आपली क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने १० विमानांसाठी भाडेतत्त्वाचा करार अंतिम केला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांचे भाडे या महिन्यात संपत आहे, अशा भाडेकरूंशी एयरलाइन आठ विमानांबाबत चर्चा करत आहे.
5 / 8
कंपनीला यापैकी किमान सहा विमाने कायम ठेवायची आहेत. तसेच ज्या दोन विमानांना ब्रेक लागला होता, ती दोन विमाने पुन्हा कार्यरत झाली आहेत. सध्या स्पाईसजेटच्या ताफ्यात ३० हून अधिक विमाने आहेत. यातील १० विमानांचा भाडेतत्त्वाचा करार अंतिम झाला आहे.
6 / 8
तर अतिरिक्त विमानांमुळे विमान प्रवासाची वाढती मागणी, विशेषत: उन्हाळ्यात सुट्टीच्या महिन्यांत पूर्ण करण्यात एअरलाइन सक्षम होईल.
7 / 8
स्पाईसजेटला अलीकडेच तीन एअरफ्रेम मिळाल्या आहेत. प्रमुख विमान भाडेकरूंसोबत केलेल्या या करारांमुळे कमी किमतीच्या विमान कंपनीसाठी ६८५ कोटी रुपयांची बचतही झाली आहे.
8 / 8
7 मार्च रोजी स्पाईसजेटने एचेलॉन आयर्लंड मॅडिसन वन लिमिटेडसोबत ४१३ कोटी रुपयांच्या वादावर यशस्वीरित्या तोडगा निघाला असल्याची घोषणा केली होती. करारानुसार, स्पाईसजेटने ३९८ कोटी रुपयांची बचत केली आणि दोन एअरफ्रेम्स खरेदी केल्या. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :spicejetस्पाइस जेटshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक