शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! पप्पा म्हणाले, चपाती गोल नसली तरी चालेल मग लेकीने उभी केली 500 कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 1:56 PM

1 / 10
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी य़ा शक्य करता येतात. 23 वर्षीय विनिता सिंह यांनी हे जगाला दाखवून दिलं आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तब्बल 500 कोटींचा बिझनेस सेटअप करणाऱ्या या तरुणीचं आता जगभरात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
2 / 10
शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक आणि शार्क टँक इंडियाच्या जज विनिता सिंह यांनी देशातच नाही तर जगभरात आपल्य़ा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दोनदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेल्या विनिता सिंह यांनी आपल्या व्यवसायाच्या आवडीपुढे एक कोटीचे पॅकेज नाकारलं
3 / 10
सुरुवातीला अपयश आल्यानंतरही त्यांनी हार नाही मानली. आज त्यांना शार्क टँक इंडियामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. विनिता यांचे आई-वडील मेडिकल बॅकग्राऊंडचे होते. त्यामुळे मुलीनेही या क्षेत्रात काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा होती. आयआयटीमधून अभियांत्रिकी केल्यानंतर त्यांनी आयआयएममधून एमबीए केले आणि स्वत:ला व्यवसायासाठी तयार केलं.
4 / 10
आयआयएममधून एमबीए केल्यानंतर त्यांना एक कोटीच्या पॅकेजची ऑफर मिळाली. पण त्यांनी दोन मित्रांसोबत आपला बिझनेस सेटअप सुरू केला. मात्र व्यवसायात गुंतवणूकदार नसल्यामुळे त्यांना हा सेटअप थांबवावा लागला. यानंतर त्यांनी सेवा पुरवठादारावर आधारित दुसरा व्यवसाय सुरू केला. नुकसानीमुळे त्यांना हा व्यवसायही बंद करावा लागला.
5 / 10
2015 मध्ये, विनिता आणि मित्र कौशिक मुखर्जी यांनी शुगर कॉस्मेटिक्स सुरू केलं. केवळ 4 लिपस्टिक शेड्सपासून सुरू झालेला हा व्यावसायिक प्रवास आज एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यावेळी देशात फॅशनची फारशी क्रेझ नव्हती. अशा परिस्थितीत फॅशन ब्रँड सुरू करणे खूप आव्हानात्मक होतं.
6 / 10
विनिता सिंह यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील त्यांना स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखायचे. चपाती गोल झाली नाही तरी चालेल असं ते म्हणाले. पण जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला आयुष्यभर काळजी करावी लागेल असा सल्लाही दिला.
7 / 10
आज शुगर कॉस्मेटिक्सच्या लिपस्टिकच्या चारही शेड्स ग्लोबल ब्रँड बनल्या आहेत. आज त्यांची 130 शहरांमध्ये 2500 हून अधिक आउटलेट आहेत. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विनिता सिंह यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :businessव्यवसाय