शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shark Tank India Highest Investment : अमन गुप्ता ते पीयूष बन्सल; पाहा शार्क टँक इंडियामध्ये कोणी केली किती कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 3:18 PM

1 / 12
Shark Tank India Highest Investment : शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये अनेक स्टार्टअप्सनी चांगले स्थान मिळवले आहे. या 'शो'चा पहिला सीझन नुकताच पार पडला. या शोमधून अनेक तरुणांच्या कल्पनांना शार्क अर्थात शोच्या जजकडून मोठी गुंतवणूकही मिळाली.
2 / 12
ही गुंतवणूक स्टार्टअप्सला यशस्वी होण्यासही मदतीची ठरणार आहे. या शोची क्रेझ सध्या वाढतानाही दिसतेय. शोचे अनेक जज आपले पैसे गुंतवत आहेत आणि गुंतवणूकदार म्हणून नवीन पिढीच्या हृदयावर राज्यही करत आहेत.
3 / 12
या शोमध्ये आपण २० ते ६० वर्षांपर्यंत वयोगटातील उद्योजकही पाहिले आहेत. या शोमध्ये देशातील अनेक भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी अनेक स्टार्टअप्सना शार्क्सकडून गुंतवणूक आणि त्यांचा सल्लाही मिळाला. तर काही जणांच्या पदरी निराशाही आली. या शोमध्ये एकूण ७ जज सहभागी झाले होते.
4 / 12
या शोमध्ये ११७ उद्योजकांनी आपल्या संकल्पना मांडल्या. यापैकी ६७ डील्स झाल्या. तर पाहूया कोणत्या जजनं किती कोटींची गुंतवणूक गेली.
5 / 12
जगातील सर्वात मोठे हेडफोन आणि इयरबड्स उत्पादक कंपनी BoAt चे सह-संस्थापक अमन गुप्ता हे (Aman Gupta) यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी २८ डील्समध्ये तब्बल ९.३५८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
6 / 12
गुप्ता यांनी या शोमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. तरुण उद्योजकांना पाठिंबा द्यायचा असल्याचं त्यांनी शोमध्ये अनेकदा नमूद केले आहे. त्यामुळेच त्यांनी तरुणांच्या स्टार्टअप्ससोबत अनेक करार केले आहेत.
7 / 12
गुंतवणुकीच्या बाबतीत पीयूष बन्सल यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. शोच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीयूष बन्सल उपस्थित नव्हते. बन्सल यांनी २७ डील्समध्ये ८.२९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जुगाडू कमलेशच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. तुमचा आवडता शार्क कोण आहे असे जर एखाद्याला विचारले तर पीयूष बन्सल हेच सर्वांचं उत्तर असेल.
8 / 12
नमिता थापर या गुंतवणुकीच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांनी २२ डील्समध्ये ६.३८३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नमिता थापर या आरोग्य सेवा क्षेत्रातील आहेत. नमिता थापर एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या (Emcure Pharmaceuticals) कार्यकारी संचालक आहेत.
9 / 12
शोदरम्यान अशनीर ग्रोव्हर ग्रोव्हर यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. भारत पेच्या अशनीर ग्रोव्हर यांनी या शो दरम्यान २१ डीलपैकी ५.३८३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
10 / 12
अनुपम मित्तल हेच असे एकमेव शार्क होते, जेप्रत्येक एपिसोडमध्ये उपस्थित होते. शो दरम्यान त्यांनी २४ डील्समध्ये ५.३३८ कोटी रुपये गुंतवले आहेत. मित्तल हे पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत. यामध्ये Shaadi.com, Makaan.com यांचा समावेश आहे.
11 / 12
विनिता सिंग यांनी शार्क टँक इंडियामध्ये एकूण १५ डील्समध्ये ३.०४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. महिला उद्योजकांशीही त्यांनी अनेक करार केले आहेत.
12 / 12
गझल अलघ या ममाअर्थच्या (MamaEarth) संस्थापक आहेत. हा एक ब्युटी ब्रँड आहे, ज्याला शिल्पा शेट्टी एन्डॉर्स करताना दिसते. त्यांनी ७ स्टार्टअपमध्ये १.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी या शोदरम्यान सर्वात कमी गुंतवणूक केली आहे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक